पुणे हादरले, सिंहगड रस्त्यावर दाम्पत्यावर कोयत्याने हल्ला Google
क्राईम

Pune Crime: पुणे हादरले, सिंहगड रस्त्यावर दाम्पत्यावर कोयत्याने हल्ला

Pune: शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात एक धक्कादायक घटना घडली. कामावरून घरी निघालेल्या दुचाकीस्वार दाम्पत्यावर एका टोळक्याने हल्ला केला. हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून तरुणाला जखमी केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात एक धक्कादायक घटना घडली. कामावरून घरी परतणाऱ्या एका दाम्पत्याचा किरकोळ कारणावरून काही तरुणांसोबत वाद झाला. या वादानंतर, त्या तरुणांनी दाम्पत्याला शिवीगाळ केली आणि कोयत्याने हल्ला केला. हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून तरुणाला जखमी केले.

दाम्पत्य सिंहगड रस्ता भागात राहायला होते. शुक्रवारी सायंकाळी, दाम्पत्य दुचाकीवरून घरी निघाले होते. सिंहगड रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयाजवळ, त्यावेळी दुचाकीवरून एक टोळका जात होता. त्या टोळक्याशी किरकोळ कारणावरून दाम्पत्याचा वाद झाला.

त्यानंतर, टोळक्याने दाम्पत्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यातल्या एकाने दाम्पत्यावर कोयता उगारला. झटापटीत टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केला. या घटनेनंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. घाबरलेल्या दाम्पत्याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घटनेची माहिती दिली.

या प्रकरणी रात्री सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत. हल्ल्याचं नेमकं कारण काय होतं आणि आरोपी कोण आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur: सोलापूर हादरले! पहाटे ट्रेनवर थरारक दरोडा, प्रवाशांना मारहाण; महिलांनाही सोडलं नाही, मोबाईल अन् दागिने लुटले

Eyes Close While Sneezing: शिंकताना आपले डोळे आपोआप बंद का होतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

Maharashtra : शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! ८ हजार शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार; कारण काय?

Ahilyanagar Fort : अभेद्य तटबंदी अन् गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची आठवण जपतोय 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT