Pune Crime : सात प्रकारची हाडे अन् कवटी, शहरात मानवी सांगाडा, शेजारी होतं...; पुण्यात धक्कादायक प्रकाराने खळबळ

Pune Yerwada Crime : लोहगावमधील खुळेवाडी मैदानावर एका व्यक्तीचा हाडांचा सापळा पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली.
Yerawada Khulewadi ground Human skeleton found
Yerawada Khulewadi ground Human skeleton foundSaam Tv News
Published On

पुणे : पुण्यातील येरवडा येथील खुळेवाडीतील एलआयसी मोकळ्या मैदानावर मानवी हाडांचा सापळा आणि कवटी आढळल्याने खळबळ उडाली आहे. विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तिथे मोबाइल आणि आधार कार्ड सापडले. ससून रुग्णालयाच्या माहितीनंतर या हाडांचा उलगडा होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

लोहगावमधील खुळेवाडी मैदानावर एका व्यक्तीचा हाडांचा सापळा पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. विमानतळ पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर मानवी व्यक्तीची सात प्रकारची हाडे आणि कवटी दिसली. त्या ठिकाणी पोलिसांना मोबाइल फोन आणि 'शिवकुमार के' या नावाचं आधार कार्ड मिळालं. पोलिसांनी पंचनामा करून हाडे पुढील तपासासाठी ससून रुग्णालयात पाठवली आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनावणे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

Yerawada Khulewadi ground Human skeleton found
Shocking : महाराष्ट्र की बिहार? मुलीची छेड काढल्याचा जाब विचारला; रागात गावगुंडांकडून कुटुंबाला लाकडी दांड्याने मारहाण

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये अतिशय भयंकर प्रकार समोर आला आहे. दौंडमध्ये चड्डी-बनियन गँगची दहशत पसरली आहे. चड्डी-बनियन गँगने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्री उशिरा घरामध्ये घुसून चड्डी-बनियन गँगमधील तिघांनी ५ जणांवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिस सध्या तपास करत आहेत.

Yerawada Khulewadi ground Human skeleton found
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंनी माफीनामा लिहून दिला, म्हणून ते निर्दोष सुटले, अन्यथा...; पीडितेच्या दाव्याने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com