loni kalabhor police station  Saam Tv
क्राईम

Pune Crime : पोलीस कर्मचाऱ्यांनीच पोलीस ठाण्यात टाकला दरोडा, लोणी काळभोरमधील कर्मचाऱ्यांचा प्रताप

Police Thief : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल यात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या आरोपीने पोलीस ठाण्यात खरे चोर असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई केलीय.

Bharat Jadhav

अक्षय बडवे ,पुणे

Police Personnel Help To Thief :

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथे कार्यरत असलेल्या पोलिासंनीच दुचाकी चोरण्यास चोराला मदत केल्याची बाब समोर आलीय. एका बाईक चोरी करणाऱ्या चोराला चोरीची दुचाकी बाजारात विकण्यास सांगत असल्याची बाब उजेडात आलीय. याप्रकरणी ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. (Latest News)

दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे, असे पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल यात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या आरोपीकडून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्माचाऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले, अशी कबुली या आरोपीने दिली तसचं या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलीस कर्मचाऱ्यांनी या आरोपीला त्या बाजारात विकण्यास सांगितले.

स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. वेळोवेळी या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशी साठी बोलावले होते मात्र त्यांनी उपस्थिती लावली नाही, परिणामी कर्तव्यात कसूरी केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. काल या ४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त यांनी जाहीर केली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT