Pune Crime  Saam Tv
क्राईम

Student Attack: स्कूल बॅगचा धक्का लागला म्हणून विद्यार्थ्यावर चाकूहल्ला, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime News: पुण्यात किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे. यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Student Attack In Pune

दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. याचं प्रमाण शाळेतील विद्यार्थ्यांमध्येही वाढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांनी एकमेकांवर हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत. दिवसेंदिवस या (Pune Crime) प्रकरणांमध्ये भर पडतेय.  (Latest Crime News)

पुण्यातून देखील असंच एक प्रकरण समोर येत आहे. पुण्यातील पिंपरी परिसरातील एका शाळेत किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला (Student attack with knife) केला आहे. यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नक्की काय घडलं

पिंपरी परिसरातील एका स्कूलमधील एक अल्पवयीन विद्यार्थी परीक्षा द्यायला जात होता. तेव्हा त्या विद्यार्थ्याची स्कूल बॅग एका दुसऱ्या विद्यार्थ्याचा धक्का लागल्यामुळे फाटली होती. त्यामुळे त्या दोघांमध्ये बाचाबाची देखील झाली (Student Attack) होती.

दोघांमध्ये किरकोळ भांडण देखील झालं होतं. याचाच राग मनात धरून दुसऱ्या विद्यार्थ्याने स्कूल बाहेरील रस्त्यावर त्या विद्यार्थ्यावर हल्ला केला. त्या विद्यार्थ्याच्या पोटात चाकूने भोसकून खून करण्याचा प्रयत्न केला आहे.

अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल

एक फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता दरम्यान शाळेसमोरील रस्त्यावर हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये (Pimpri Police Station Area) सहा- सात अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसंच आरोपी अल्पवयीन मुलांच्या पालकांनाही पिंपरी पोलिसांनी समजपत्र दिलं आहे. या घटनेमुळे शाळेत काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेविषयी पालकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

भारतात पेट्रोल-डिझेल कुठून येते? तुम्हाला माहितीये का?

Maharashtra News Live Update: अहिल्यानगरमध्ये गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी दोन डाॅक्टर गजाआड

Vidarbha Expressway : मोठी बातमी! विदर्भात ४ महामार्ग होणार, कुठून कोणता एक्सप्रेस वे जाणार? वाचा A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT