Pune Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime News: सदाशिव पेठ कोयता हल्ला प्रकरण! हल्लेखोर तरुणावर एमपीडीए कारवाई; पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश

Pune Crime News: तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या तरुणावर कारवाई करण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

Pune:

पुण्यातील (Pune) सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. आरोपीविरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई झाली असून त्याला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शंतनू लक्ष्मण जाधव (वय २०) असं आरोपीचं नाव आहे. शंतनूने एकतर्फी प्रेमातून पेरुगेट चौकीजवळ महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणीचा पाठलाग केला होता. पाठलाग करत त्याने तिच्या डोक्यावर जोरदार कोयत्याने वार केला. यात तरुणी जखमी झाली होती. घटनेनंतर विश्रामबाग पोलीस (Police) ठाण्यात आरोपी विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यावरू न्यायालयाने शंतनूचा जामीन मंजूर केला. त्यानंतर त्याच्या वर्तनात काही सुधारणा होईल अशी आशा होती. मात्र त्याच्या वर्तनात काहीही सुधारणा झाली नाही.

पुण्यातील सदाशिव पेठेत घडलेल्या या थरारक घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला होता. तरुणीने आरोपीला प्रेम संबंधांसाठी नकार दिला होता. नकार दिल्याने त्याला राग अनावर झाला आणि त्याने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. यावेळी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या दोन बहादूर तरुणांनी तरुणीचा जीव वाचवला होता. या घटनेत आता हल्लेखोर तरुणाला १ वर्षांसाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NHAI Toll System : टोलनाक्यावरील रांगेपासून सुटका, 'या' हायवेवरून आता सुसाट प्रवास, केंद्र सरकारने आणली नवी योजना

Land Calcualtion: आता शेतजमीनीची मोजणी फक्त २०० रुपयात होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र, सोलापुरातील राजकारण फिरणार

Chinmayee Sumeet : "होय मी जयभीमवाली..."; चिन्मयी सुमितचं बेधडक वक्तव्य

SCROLL FOR NEXT