Pune Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime News: पुण्यात ९ वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार; कोंढवा परिसरातील धक्कादायक घटना

Pune Kondhwa News: मुलाच्या वागण्यात बदल झाला होता. आपल्या भाच्याच्या आयुष्यात काहीतरी गैर घडल्याचं मामाच्या लक्षात आलं.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Kondhwa Crime News:

पुण्यातील ( Pune) कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. नऊ वर्षांच्या एका चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलाच्या मामाने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सर्व प्रकार समोर आलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मौहम्मद युसुफ असं आरोपीचं नाव आहे. सदर घटनेत पोक्सो अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. घडलेल्या घटनेमुळे मुलगा घराबाहेर पडत नव्हता. त्याला सर्वांची भीती वाटायची. मुलाच्या वागण्यात बदल झाला होता. आपल्या भाच्याच्या आयुष्यात काहीतरी गैर घडल्याचं मामाच्या लक्षात आलं.

त्यानंतर मामाने त्याची चौकशी केली. त्याच्या मनातील भीती नेमकी काय आहे हे जाणून घेतलं. मामावर विश्वास ठेवून चिमुकल्याने देखील घडलेल्या प्रसंगाबाबत मामाला माहिती दिली. भाच्यासोबत घडलेला प्रकार ऐकून मामाचा संताप झाला. त्याने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घटनेबाबात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकला १० नोव्हेंबर रोजी त्याच्या मित्रासह कोंढवा येथे बाहेर एका ठिकाणी गेला होता. यावेळी तेथे आरोपी आला आणि त्याने पीडित अल्पवयीन व त्याच्या मित्राला एका खोलीत नेले. त्यानंतर त्याने पीडित अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केले. मुलाने घरी याबाबत सांगितल्यावर सगळा प्रकार उघडकीस आलाय. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

SCROLL FOR NEXT