Pune Crime Saam TV
क्राईम

Pune Crime : गावातील मेंढपाळ अचानक गायब झाला; पोलीस तपासात भयंकर सत्य उघडकीस

Crime News : अपहरण करण्यात आलेले शिंपले एक मेंढपाळ आहेत. २८ फेब्रुवारी रोजी चारचाकी वाहनामधून काही आरोपींनी त्यांचे अपहरण केले होते. या अपहरणाच्या घटनेची सीसीटीव्ही दृश्य आता समोर आली आहेत.

गोपाल मोटघरे

Pune News :

पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. २८ फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील धनेश्वर मंदिराजवळ तुकाराम साधू शिंपले गावातून अचानक बेपत्ता झाले. पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली असता त्याचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे.

अपहरण करण्यात आलेले शिंपले एक मेंढपाळ आहेत. २८ फेब्रुवारी रोजी चारचाकी वाहनामधून काही आरोपींनी त्यांचे अपहरण केले होते. या अपहरणाच्या घटनेची सीसीटीव्ही दृश्य आता समोर आली आहेत. जुन्या पैशाच्या वादातून तुकाराम शिंपले याचं काही आरोपींनी मिळुन अपहरण केल होत, असं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.

तसेच तुकाराम शिंपले यांचे अपहरण करणाऱ्या टोळक्यातील एका आरोपीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर असे आहे. ज्ञानेश्वर मूळचा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्याचा रहिवासी आहे.

त्याच गावात तुकाराम शिंपले मेंढपाळ राखण्याचा व्यवसाय करत आहेत. आपल्या गावी असताना तुकाराम शिंपले याने मेंढपाळ रघुनाथ नरुटे यांच्या शेळ्या मेंढ्याची विक्री करण्यामध्ये मध्यस्थी केली होती. मात्र खरेदी दाराने रघुनाथ यांचे जवळपास 14 लाख रुपये न दिल्याने, मेंढपाळ विक्रेता रघुनाथ हा तुकाराम शिंपले यांच्याकडे वारंवार पैशासाठी तगादा लावायचा.

त्यामुळे तुकाराम शिंपले यांनी आपल्या पत्नीसह आपलं मूळ गाव सोडून दिलं. त्यानंतर दोघेही मागील दोन वर्षांपासून चिंचवड भागातील धनेश्वर मंदिर या ठिकाणी राहत होते. त्यामुळे तुकाराम शिंपले यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी रुघुनात नरुटे याने आपला भाचा ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर याच्या मदतीने एका चारचाकी वाहनांमध्ये 28 फेब्रुवारीला चिंचवड मधून तुकाराम शिंपले याचा अपहरण केलं होतं.

तुकाराम शिंपले याचं अपहरण केल्यानंतर आरोपींनी तुकाराम शिंपले याला बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील दुर्गम ठिकाणी एका खोलीत डांबून ठेवले होते. मात्र पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा दोन पोलीस पथकाने अतिशय कौशल्याने तपास करत तुकाराम शिंपले यांची सुखरूप सुटका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ कोपरगावमध्ये होणार मुख्यमंत्र्यांची सभा

Election Commission : निवडणूक यादीतील घोळाची सत्ताधाऱ्यांना झळ; विरोधीपक्षानंतर भाजपने घेतली हरकत, नेमकं काय घडलं?

Dr Gauri Gajge Case: डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या की हत्या? शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड

Mangalsutra Importance: काळा रंग अशुभ मानतात, तरीही मंगळसूत्राचे मणी काळे का असतात?

Goddess Idol Conversion: मुंबईत देवी-देवतांचं धर्मांतर; काली माता बनली 'मदर मेरी'

SCROLL FOR NEXT