Pune Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime News : मित्राच्या मदतीने मुलीने केली आईची हत्या; थरारक घटनेनं पुणे हादरलं

Crime News : यामध्ये मंगल गोखले असे मृत महिलेचे म्हणजेच आईचे नाव आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी याप्रकरणी योगिता गोखले आणि तिचा मित्र यश शितोळे या दोघांवर गुन्हा दाखल केलाय.

Ruchika Jadhav

Pune News :

पुण्यातून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका तरुणीने मित्राच्या मदतीने आपल्याच आईचा खून केला आहे. मित्राच्या मदतीने स्वतःच्या आईच्या डोक्यात हातोडा घालत हत्या केलीये. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्यातील वडगाव शेरी भागातील ही घटना घडली. यामध्ये मंगल गोखले असे मृत महिलेचे म्हणजेच आईचे नाव आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी याप्रकरणी योगिता गोखले आणि तिचा मित्र यश शितोळे या दोघांवर गुन्हा दाखल केलाय.

हत्ये मागचं कारण

योगिताने मित्र यशच्या मदतीने आईच्या बँक खात्यातून पैसे काढले होते. आईला न सांगता आपण पैसे काढले आहेत. त्यामुळे तिला समजेल तेव्हा ती खूप रागवेल अशी भीती योगिताच्या मनात होती. यातून तिने आईची हत्या करण्याचा निर्णय घेतला.

तिने प्लान आखला आणि आपल्या मित्राला घरी बोलावलं. घरातील हातोडा त्याला दिला. त्यानंतर या मित्राने आई झोपलेली असताना तिच्या डोक्यात हातोडा घातला. जोरात मार लागल्याने यातच आईचा मृत्यू झाला.

कुणाला संशय येऊनये म्हणून आई पाय घसरून पडली असा बनव केला. मात्र नातेवाईकांना वेगळाच संशय आला. त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी मुलीची कसून चौकशी केली. त्यावेळी ही माहिती समोर आली. आता चंदन नगर पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah : राजकीय निवृत्तीनंतर काय करणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितला प्लान

Virat Kohli : कसोटीतून निवृत्ती का घेतली? विराट कोहलीनं विचित्र कारण सांगितलं, म्हणाला, जेव्हा ४ दिवसांत दाढी...

Maharashtra Live News Update : अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

Pune News : 'स्पा सेंटरमध्ये फक्त स्पा चालू ठेवा, अन्यथा...' पुणे पोलिसांचा मालकांना सज्जड दम

Vande Bharat : नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला; कुठे कुठे थांबणार? तिकिट किती? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT