Pune Crime News  Saam TV
क्राईम

Pune Crime News : वॉशिंग मशीन विकायला गेला आणि गमवून बसला दीड लाख रुपये; पुण्यात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट

Cybercrime : वस्तू खरेदीच्या बहाण्याने एकाने क्युआर कोड पाठवून फसवणूक केली. या फसवणुकीत तब्बल दीड लाख रुपये लंपास करण्यात आलेत. सदर घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे.

Ruchika Jadhav

अक्षय बडवे

Pune Crime News :

पुण्यात सायबर क्राईमच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज अशा फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशात ऑनलाईन वॉशिंग मशीन विकणाऱ्या एका तरुणाला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आलीये. सदर घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे.

ओएलएक्सवर वॉशिंग मशीन विकण्याची जाहिरात या व्यक्तीने दिली होती. वस्तू खरेदीच्या बहाण्याने एकाने क्युआर कोड पाठवून फसवणूक केली. या फसवणुकीत तब्बल दीड लाख रुपये लंपास करण्यात आलेत. पुण्यातील वाघोली परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

एका इलेक्ट्रॉनिक्स शोरुम व्यवस्थापकाने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना इलेक्ट्रॉनिक्स शोरूमकडून वॉशिंग मशीन भेट मिळाली होती. मात्र ती वापरायची नसल्यामुळे त्यांनी ती विकायची ठरवली. यासाठी त्यांनी त्या वॉशिंग मशीनची जाहिरात ओएलएक्सवर या वेबसाईटवर अपलोड केली.

एका व्यक्तीने मशिन खरेदी करण्याच्या बहाण्याने फिर्यादीशी संपर्क साधला. मशीनबाबत सर्व माहिती घेऊन फिर्यादीच्या मनात विश्वास निर्माण केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला क्यूआर कोड पाठवला आणि पाच रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर विकत घेतलेल्या मशीनचे सर्व पैसे तुमच्या अकाउंटला येतील असं त्याने सांगितलं.

क्यूआर कोड स्कॅन करून ५ रुपये पाठवल्यावर त्यांच्या बँक खात्यातून एक लाख ५५ हजार रुपये कट झाले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस सदर व्यक्तीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mysterious Fort : गुप्त बोगदे, लपलेले तळघर अन् लष्करी रचना; १८व्या शतकातील रहस्यमयी किल्ला

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० 'या' दिवशी जमा होणार? फडणवीस सरकार आज घेणार मोठा निर्णय

Running after 35: वयाच्या ३५ वर्षांनंतर महिलांनी वॉक करावं की रनिंग?

Maharashtra News Live Update: धाराशी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती, सोयाबीन पीक मातीमोल

Pune : गुरुवारी पुण्यात पाणीबाणी!  शहराचा पाणीपुरवठा २४ तास बंद; 'या' भागांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT