Pune News Saam tv
क्राईम

Pune Crime News: पुण्यात टोळक्यांचा हैदोस सुरूच; 31 डिसेंबरच्या रात्री दोघांना बेदम मारहाण, परिसरात दहशत

Pune Crime News: पुण्यात टोळक्यांचा हैदोस सुरुच असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील टोळक्यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री दोन जणांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव, पुणे

Pune Crime News In Marathi:

पुण्यात टोळक्यांचा हैदोस सुरुच असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील टोळक्यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री दोन जणांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. कर्वेनगर भागातील हिंगणे होम कॉलनीतील हा प्रकार आहे. रात्रीच्या सुमारास टोळक्यांनी दोघांना मारहाण केल्याने परिसरात एकच दहशत पसरली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील (Pune) कर्वेनगर भागातील हिंगणे होम कॉलनीत टोळक्यांनी दोन जणांना मारहाण केली. राहुल कावळे आणि निखिल पाबळे असे मारहाण झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. ३१ डिसेंबरला भररस्त्यात मारहाण केल्याने परिसरात दहशत पसरली आहे. वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?

३१ डिसेंबरच्या रात्री राहुल कावळे आणि निखिल पाबळे हे दोघे रस्त्यावरून जात होते. पुण्याच्या कर्वेनगर भागातील हिंगणे होम कॉलनीतून जाताना सात ते आठ जणांचे टोळके आले. टोळक्यातील सात ते आठ जणांनी या दोघांना मारहाण केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निखिलला कानशिलात लगावली

निखिल पाबळे हा रस्त्यावरुन जात होता. त्यावेळी टोळक्यातील एकाने त्याला कानशिलात लगावली. मारहाणीचा जाब विचारल्याने टोळक्यातील सात ते आठ जणांनी या दोघांनाही बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा वारजे पोलीस अधिक तपास करत आहेत .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : नगराध्यक्षांपाठोपाठ आता नगरसेवकांचेही ठरले; काहींचे गणित जमले तर काहींचे बिघडले

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

SCROLL FOR NEXT