Pune Crime Saam tv
क्राईम

Pune Crime : पुणे हादरलं! शालेय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; वाघोली भागातील शाळेतील प्रकार

Pune News : पुन्हा वर्गात येऊन तुला इथेच फिल्म दाखवतो असे बोलून त्यांनी मोबाईलमध्ये एक वेबसाईट दाखवली आणि कोणाला काही सांगू नको

Rajesh Sonwane

अक्षय बडवे 

पुणे : पुण्यातील वाघोली भागात असणाऱ्या नामांकित शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune) या शाळेत १० वर्षीय मुलावर शाळेतील शौचालयात लैगिक अत्याचार केल्याचा लज्जास्पद प्रकार घडला आहे. या प्रकरणी पिडीत मुलाच्या आईने पोलिसात (police) तक्रार दिली असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. (Breaking Marathi News)

पुणे शहरातील वाघोली परिसरात असलेल्या नामांकित शाळेत फिर्यादी यांचा १० वर्षीय मुलगा शिक्षण घेत होता. दरम्यान १९ एप्रिलला फिर्यादी यांनी त्याला शाळेमध्ये सोडल्यानंतर आरोपीने पिडीत मुलाला तू  त्याचे नाव विचारून "मुव्ही बगतो की नाही. मी तुला एक फिल्म दाखवतो टॉयलेटमध्ये चल..असे सांगितले. (Pune Crime) याला पिडीत मुलाने संबंधितास नकार दिला. यावर आरोपीने इथले सगळे कॅमेरे बंद आहेत तू काही काळजी करू नकोस कोणाला काही समजणार नाही असं सांगितलं आणि त्याच्यावर जबरदस्ती करू लागले. या कृतीला घाबरून पिडीत मुलगा तेथून पळून गेला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते पुन्हा वर्गात आले 

थोड्या वेळाने आरोपी पुन्हा वर्गात येऊन तुला इथेच फिल्म दाखवतो असे बोलून त्यांनी मोबाईलमध्ये एक अश्लील वेबसाईट दाखवली आणि कोणाला काही सांगू नको अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुलाने सदर प्रकार आईला सांगितला. यानंतर पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT