Indore News: Saam tv
क्राईम

Pune Crime: मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार, बोपदेव घाटातील घटना; पुणे हादरलं

Pune Latest News: पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या बोपदेव घाटामध्ये सामुहिक अत्याचाराची भयंकर घटना समोर आली आहे. पीडित तरुणीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, पुणे

Pune Bopdev Ghat Crime: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. कालच पुण्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर स्कूल बसमध्येच अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच कोंढवा परिसरातील बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामुहिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या बोपदेव घाटामध्ये सामुहिक अत्याचाराची भयंकर घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास २१ वर्षीय तरुणीवर तिघा अज्ञात तरुणांनी सामूहिक अत्याचार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत तरुणी ही मित्राबरोबर बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती. यावेळी तीन अज्ञात नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित तरुणीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. बलात्कार करणाऱ्या तिन्ही आरोपीचा शोध कोंढवा पोलिसांसह गुन्हे शाखा घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण; आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Daily wear Mangalsutra Design: डेली वेअरसाठी 'हे' नाजूक आणि एलिग्नंट मंगळसूत्र डिझाईन, नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update : बीड जिल्ह्यातील चार नगरपरिषदाच्या दहा जागांसाठी आज मतदान

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेजची सुरुवातीची लक्षणे काय? जाणून घ्या याचं मूळ कारण अन् शरीरावर होणारा परिणाम

Weight Loss: दररोज सकाळी 'हे' काम केल्याने वजन होईल लवकर कमी, आठवडाभर करुन पाहा हे उपाय

SCROLL FOR NEXT