Pune Crime News Saam Tv
क्राईम

Pune Crime: गाडी नीट चालवा म्हटल्याने तरुणांची सटकली, मारहाण करत व्यावसायिकावर धारधार शस्त्राने वार

Pune Crime News: पुण्यात कसबा गणफती मंदिराजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. गाडी नीट चालवा, असं म्हटल्यावर दोन तरुणांनी एका व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारले आहे. त्यानंतर धारदार शस्त्रांनी वार केले आहेत.

Siddhi Hande

पुण्यात एक धक्कादायक घटना घडत आहे.पुण्यात भरदिवसा रस्त्यात एका व्यावसायिकावर हत्याराने वार केले आहेत. 'गाडी नीट चालवा,' असे म्हटल्याने दोघांनी व्यावसायिकावर हत्याराने वार केले आहे.गाडी नीट चालवा असं सांगितल्याचा राग आला. त्यामुळे त्यांनी वार केला. कसबा गणपती मंदिराजवळ ही घटना घडली आहे.याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत योगेश गोपाळजी ठक्कर (वय ४५, भवानी पेठ) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार योगेश ठक्कर रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कसबा गणपती मंदिर परिसरातून निघाले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी एका दुचाकीस्वारास 'गाडी नीट चालवा,' असे म्हटले.त्यानंतर ते मंदिराजवळ दुचाकी लावत होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या त्या दोघांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या हातावर आणि पाठीवर हत्याराने वार करून ते पसार झाले.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी करीत आहेत.या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पुण्यात एका व्यक्तीकडून ४० लाख घेऊन केली फसवणूक

पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढत आहे. हडपसरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देतो म्हणून एका व्यावसायिकाकडून ४० लाख रुपये घेतले आहेत. तुमच्या मुलीचे अॅडमिशन करुन देतो, असं सांगून त्या व्यावसायिकाची फसवणूक केली आहे.याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कांजुरमार्ग पूर्व येथील इमारतीला आग

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

Kanda Poha Recipe: मऊ आणि मोकळे कांदा पोहे बनवण्यासाठी 'या' 5 सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा

HSC Hall Ticket: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट समोर

धक्कादायक! भाजप नेता स्टेजवर चढताना धाडकन तोंडावर आपटला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT