Pune Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime News : पुणे हादरलं! हडपसरमध्ये २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

Ruchika Jadhav

पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. आज पुण्यातील हडपसर परिसरामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. अल्पवयीन मुलींवरच्या अत्याचाराने पुण्यातील हडपसर परिसरामध्ये खळबळ पसरली आहे.

मिळालेल्या आधिक माहितीनुसार, पहिल्या घटनेत 42 वर्षीय आरोपीने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तसेच या नराधमाने मुलीला मारहाण सुद्धा केली आहे.

अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसह हडपसर परिसरातील पुनर्वसन केलेल्या शासकीय वसाहतीमध्ये राहायला आहे. 42 वर्षीय आरोपीने मुलीच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घरामध्ये प्रवेश केला आणि मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

पीडित अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांपूर्वी सुद्धा लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेतून पीडिता सावरत नाही तोच पुन्हा तिच्यावर नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

तर दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध करत धमकी आणि मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 31 वर्षीय आरोपी आणि त्याचा दुसरा नातेवाईक या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपींनी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लोणी काळभोर येथील एका हॉटेलमध्ये नेले. त्यांतर 31 वर्ष आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला तर त्याचा दुसरा नातेवाईक याने अल्पवयीन तरुणीला आरोपी सोबत लैंगिक संबंध ठेव म्हणत वहिनी म्हणून तिचा विनयभंग केला.

या दोन्ही घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडल्या आहेत. दोन्ही आरोपींविरोधात हडपसर पोलीस स्थानकात ॲट्रॉसिटीसह लैंगिक अत्याचार आणि इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anupam Kher: 500 च्या नोटेवर अनुपम खेर? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? जाणून घ्या

Nitin Gadkari: 'लाडकी'चा भरोसा नाय! गडकरींच्या विधानानं सरकारची कोंडी

Maharashtra Politics : गोरगरीब विद्यार्थ्यांची थट्टा; दादा कोंडके स्टाईल सरकारी गणवेशावरून विरोधक बरसले, पाह व्हिडिओ

Rajyamata Gomata : देशी गाय मतांची 'साय'? निवडणुकीआधी महायुती सरकारची 'गोमाता' रणनीती, पाहा व्हिडिओ

Laxman Hake Explanation: '⁠मी मद्यप्राशन केलेलं नाही, कोणतीही टेस्ट करायला तयार', मराठा आंदोलकांच्या आरोपांवर लक्ष्मण हाके यांचं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT