19 years old girl supporting pakistan on instagram post Saam Tv News
क्राईम

Pune Crime : पाकिस्तानचं लांगुलचालन करणाऱ्या तरुणीची कोर्टात धाव, म्हणते कॉलेजनं मला काढलं; पण...

Pune Girl Pakistan Support Message : त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिची खोड मोडली आणि बेड्या ठोकल्या होत्या. पाकिस्तानच्या बाजूने नारे देणारी पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर शेअर करताच व्हायरल झाली होती.

Prashant Patil

पुणे : भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, सोशल मीडियावर भारतात राहून पाकिस्तानचं लांगुलचालन करणाऱ्या समर्थकांची उदाहरणं पाहायला मिळत आहेत. पुण्यातील कोंढवा परिसरात परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने अशाच प्रकारची पोस्ट शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिची खोड मोडली आणि बेड्या ठोकल्या होत्या. पाकिस्तानच्या बाजूने नारे देणारी पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर शेअर करताच व्हायरल झाली होती. या प्रकरणी संबंधित तरुणीच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२, १९६, १९७, २९९, ३५२, ३५३ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. खतीजा शहाबुद्दीन शेख (वय १९) असं आरोपी तरुणीचं नाव आहे. कोंढवा पोलिसांनी तिला अटक केली होती. इतकंच नाही तर ही तरुणी ज्या सिंहगड कॉलेजमध्ये शिकत होती त्यांनीही तिला काढून टाकलं होतं.

तरुणीची उच्च न्यायालयात धाव

त्यानंतर आता या तरुणीने उच्च न्यायालयात धाव घेत महाविद्यालयाने तिच्यावर केलेली कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे. ही तरुणी सिंहगड अकादमी ऑफ इंजिनिअरिंग विनाअनुदानित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. महाविद्यालयाने या तरुणीला काढून टाकल्यानंतर, महाविद्यालयाचा निर्णय मनमानी आणि बेकायदेशीर आहे, असा दावा करून या तरुणीने वकील फरहाना शाह यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

आपल्याला काढून टाकण्याचा महाविद्यालयाचा निर्णय मनमानी आणि बेकायदा ठरवून रद्द करावा. तसेच, महाविद्यालयात पुन्हा सामावून घेण्याचं आणि २४ मे पासून सुरू होणाऱ्या सत्र परीक्षेला बसू देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या तरुणीने केली आहे. तर, समाजमाध्यावर आलेली प्रतिक्रिया आपण फक्त पुन्हा प्रसिद्ध केली. ती आपण कोणत्याही वाईट हेतूशिवाय पुन्हा प्रसिद्ध केली होती आणि चूक लक्षात आल्यानंतर हटवली देखील होती. तसेच, चुकीसाठी माफीही मागितली होती. असं तरुणीने केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT