Pune Crime Saam tv
क्राईम

Pune Crime : १०० सीसीटीव्ही तपासून आरोपी ताब्यात; बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा

Pune News : एका संशयित महिलेचा मृत्यू प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दरम्यान १ एप्रिलला एका महिलेला सिरम इन्स्टीट्यूट येथून मांजरी रेल्वे स्टेशनपर्यंत शेअर रिक्षातून घेऊन एक संशयित दिसला

Rajesh Sonwane

अक्षय बडवे 

पुणे : पुण्यातील मांजरी स्टेशन जवळ १ एप्रिल रोजी एका बेवारस महिलेचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. (Pune) मात्र पोलिसांनी याचा अधिक तपास करत शवविच्छेदनमध्ये महिलेचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले होते. यानंत परिसरातील १०० पेक्षा आधीक सीसीटिव्ही तपासून बेवारस महिलेच्या खूनाचा (Pune Police) पुणे पोलिसांनी उलगडा करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

विक्रम उर्फ बाळू रघुनाथ जाधव असे (Pune Crime) पुणे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात एका संशयित महिलेचा मृत्यू प्रकरणी (Hadapsar) हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दरम्यान १ एप्रिलला एका महिलेला सिरम इन्स्टीट्यूट (Crime News) येथून मांजरी रेल्वे स्टेशनपर्यंत शेअर रिक्षातून घेऊन एक संशयित दिसला. पोलिसांनी शेअर रिक्षाची बारकाईने तपासणी केली असता त्यावर एका शाळेची जाहिरात लावल्याचे आढळून आले. 

पोलिसांनी संबंधित शाळेत जाऊन रिक्षा बाबत चौकशी केली असता शाळेने ३०० रिक्षांना जाहिरात लावल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सर्व रिक्षांची माहिती घेऊन आरोपीने प्रवास केलेल्या रिक्षाचा शोध घेतला. दरम्यान, आरोपी हा यवतमध्ये असल्याचे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले. तेथून आरोपीला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली. मात्र संशयिताने नेमकी ही हत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT