Amravati News : धक्कादायक..भारतीय सैन्य दलातील जवानाने संपविले जीवन; आजारी वडिलांना भेटण्यासाठी आले होते सुटीवर

Amravati News : भारतीय सैन्य दलात नोकरीला असून त्यांचे वडील आजारी असल्यामुळे ते गेल्या दहा दिवसापासून ते सुट्टीवर अमरावती आले होते.
Amravati News
Amravati NewsSaam tv

अमर घटारे 
अमरावती
: अमरावती शहरातील भारतीय सैन्य दलात कार्यरत जवान वडील आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी सुटी घेऊन घरी आले होते. मात्र त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (Amravati) अमरावती शहरात समोर आली आहे. 

Amravati News
Uddhav Thackeray: शिवसेना पक्ष अन् चिन्ह पुन्हा मिळणार? 'रोखठोक' मुलाखतीत उद्धव ठाकरेंचे सर्वात मोठे विधान!

जवान विशाल विनोदराव चव्हाण असे आत्महत्या केलेल्या जवानांचे नाव आहे. मृत विशाल चव्हाण हे भारतीय सैन्य दलात नोकरीला असून त्यांचे वडील आजारी असल्यामुळे ते गेल्या दहा दिवसापासून ते सुट्टीवर अमरावती आले  होते. दरम्यान वडिलांची भेट घेऊन त्यांनी गप्पा मारल्या. यानंतर त्यांनी अमरावती येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. बातमी (Soldier) नातेवाईकांना समजल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांची अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Amravati News
Bribe Case : शाळा प्रवेशासाठी लाच; मुख्याध्यापकासह शिक्षक ताब्यात

वडील देखील होते सैन्य दलात  

विशाल चव्हाण यांचे वडील सुद्धा भारतीय सैन्य दलात (Indian Army) नोकरीला होते. यामुळे घरात चांगले वातावरण होते. दरम्यान सुटीवर आलेल्या विशाल चव्हाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पुढील तपास गाडगे नगर पोलीस करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com