Pune Crime News Saam Tv
क्राईम

Pune Crime: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, नवऱ्याची सटकली; बायकोवर कुऱ्हाडीने वार

Man Attacks Wife with Axe: पुण्यामध्ये दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही त्यामुळे नवऱ्याने बायकोवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात बायको गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी आरोपी नवऱ्याला अटक करण्यात आली.

Priya More

सचिन जाधव, पुणे

नवऱ्याने बायकोच्या डोक्यात कुऱ्हाड घातल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही त्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने बायकोवर कुऱ्हाडीने वार केले पुण्याच्या पद्मावती परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी नवऱ्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूनम दत्ता अडागळे (३२ वर्षे) असं जखमी महिलेचे नाव आहे. पूनम पुण्यातील पद्मावती परिसरातील तळजाई वसहतीमध्ये नवरा दत्ता राजाराम अडागळे( ३८ वर्षे) याच्यासोबत राहते. पूनमचा नवरा दत्ताला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे तो नेहमी तिच्यासोबत वाद घालतो. दत्ताने पूनमकडे नेहमीप्रमाणे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पूनमने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या दत्ताने तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले.

नवऱ्याने पूनमवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पूनम गंभीर जखमी झालेत. याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्यात पूनमकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी पूनमचा नवरा दत्ताविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे पुण्यात चर्चा होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये दत्ता आणि पूनमचा विवाह झाला होता. त्यांना ७ वर्षांचा मुलगा आहे. दत्ता काहीही काम करत नव्हता. तसेच त्याला दारूचे व्यसन आहे. पूनम घरकाम करत कुटुंबाचा सांभाळ करते. सोमवारी रात्री आठच्या सुमारास दत्ता दारू पिऊन घरी आला. त्याने दारू पिण्यासाठी पूनमकडे पैसे मागितले. तिने पैसे देण्यास नकार त्यानंतर चिडलेल्या दत्ताने घरातील कुऱ्हाडीने पूनमवर हल्ला केला. पूनमने आरडाओरडा केला. तेव्हा सासूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण दत्ताने पूनमच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव बसला आणि ती गंभीर जखमी झाली. पूनमवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT