Pune crime  Saam Tv
क्राईम

Pune Crime: जेवण न दिल्यानं नवऱ्याची सटकली; रागाच्या भरात बायकोच्या छातीत मारल्या बुक्या, महिलेचा मृत्यू

Pune crime : जेवण तयार केले नाही म्हणून बेदम मारहाण करून पत्नीचा हत्या केल्याची घटना कात्रजमध्ये घडलीय. पत्नीचा खून करणाऱ्या पतीला भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

Bharat Jadhav

Husban killed wife :

जेवण मिळालं नसल्याच्या रागात पत्नीचा खून केल्याची घटना घडलीय. ही घटना कात्रज भागात घडलीय. येथील दत्तनगर परिसरात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडलीय. याप्रकरणी मारहाण करून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केलीय. (Latest News)

हत्या झालेली ४२ वर्षीय महिला स्वामी समर्थनगर, दत्तनगर, कात्रज येथे राहत होते. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या पती विरुद्धात त्याच्या १९ वर्षीय मुलाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती हा पेशाने पेंटर असून रोजंदारीवर काम करत होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे मद्यपान करून घरी आला होता.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी त्याने त्याच्या पत्नी माधुरीला जेवायला वाढण्यास सांगितले. यावर तिने त्याला जेवण न बनवल्याचे उत्तर दिले. जेवण न दिल्याच्या रागातून त्याने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरूवात केली. यादरम्यान त्याने पत्नीच्या छातीवर जोर-जोरात बुक्या मारल्या या मारहणीनंतर पत्नी खाली कोसळली आणि यात तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तानाजी हा मजुरी करतो. त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास तो घरी आला. जेवण तयार केले नाही म्हणून आरोपी पत्नीवर चिडला. त्याने पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत मधुरा गंभीर जखमी झाल्या होत्या. बेशुद्धावस्थेतील मधुरा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे तानाजीवर पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील पाटील या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT