Daylight firing in Pune’s Koregaon Mul goes viral, raising serious questions on law and order. saamtv
क्राईम

Pune Crime: पुण्यात चाललंय काय? पोलीस ठाण्याच्या हद्दीतच भरदिवसा हवेत गोळीबार|Video Viral

Firing in Police Police Station Area: पुण्यातील कोरेगाव मूल येथे पोलिसांच्या हद्दीत दिवसाढवळ्या गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर चिंता निर्माण झालीय.

Bharat Jadhav

  • पुण्यात कोरेगाव मुळ गावात भरदिवसा गोळीबाराची घटना.

  • पोलीस ठाण्याच्या हद्दीतच गुन्हा घडल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.

  • गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुण्याच्या उरुळी कांचनमधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार केल्याची घटना घडलीय. कोरेगाव मुळ या गावातील पोलीस ठाण्यातच एकानं भरदिवसा हवेत गोळीबार केलाय. विजयादशमीच्या निमित्ताने सीमोल्लंघन करत असताना कायद्याचेच उल्लंघन केल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगावात घडल्याचं उघडकीस आला. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा चिंधड्या उडवल्या जात असल्याचं समोर येत आहे.

भरदिवसा एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या गोळीबारीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांनी वाढत्या गुन्हेगारी आणि पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. सार्वजनिक ठिकाणी,असा प्रकार घडू कसा शकतो, यावरून नागरिक संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दोन पिस्तुलांचे पूजन करून हवेत गोळीबाराचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेला दोन दिवस उलटूनही पोलिसांकडे अधिकृत तक्रार पोहोचली नसल्याचे समोर आले. त्यामुळे “महाराष्ट्राचा बिहार झाला का?” असा सवाल नागरिक सोशल मीडियावर उपस्थित करत आहेत. वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांची निष्क्रियता यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तीन-चार पिस्तूलांची पूजन करताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये दोन जण खाली बसलेले दिसत आहेत, त्याच्यासमोर दोन पिस्तूल ठेवले आहेत. त्या फोटोला विजयादशमीनिमित्त शस्त्र पूजन, असं कॅप्शन दिलंय. त्यानंतर एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये एकजण पिस्तुलातून हवेत गोळीबार करताना दिसत आहे. त्यामुळे पुण्यात कायद्याचा धाक राहिला नाहीये.

हत्येचा Live Video! १२ सेकंदात झाडल्या ३ गोळ्या

उत्तरप्रदेशातील मेरठ या ठिकाणी झालेल्या गोळीबाराचा लाईव्ह व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्याची गोळ्या झाडून हत्या झाली, त्याचे नाव आदिल असे आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आदिल जमिनीवर पडलेला दिसतो. लोअर्स आणि टी-शर्ट घातलेला आरोपी आदिलवर गोळ्या झाडताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Mhada House : म्हाडाच्या घरांसाठी अर्जांचा पाऊस; सानपाड्यातील २ घरांसाठी तब्बल ६१५६ अर्ज, प्राइम लोकेशन आहे तरी कुठं?

Gautam Patil : गौतमी पाटीलला अटक होणार? 'ते' प्रकरण अंगलट येणार, नेमकं काय घडलं होतं?

Maharashtra Politics: आता उद्धव ठाकरेंचं मिशन मराठवाडा, शेतकऱ्यांसाठी ठाकरे रस्त्यावर उतरणार?

Mumbai Crime: आरे कॉलनीत डान्सरवर बलात्कार; सराव करताना नृत्य प्रशिक्षकाची नियत फिरली, दारू पाजली नंतर...

Thane Crime : ठाण्यातील उपायुक्ताला २५ लाखांच्या लाचखोरीत अटक; आता फरार सुशांत अडकला

SCROLL FOR NEXT