Pune Crime 
क्राईम

Pune Crime: पुण्यात चाललंय काय? क्षुल्लक कारणावरून इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी उगारला कोयता

Pune Crime: इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये हा प्रकार घडला आहे. एकमेकांकडे बघितल्यामुळे तसंच फोनवर मोठ्या आवाजात बोलत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय बडवे

पुणे: क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात विद्यार्थ्यांनी एकमेकांवर कोयता उगारल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडलीय. येथील डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये इंजीनियरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत असललेल्या विद्यार्थ्यांमध्ये क्षुल्ल्क कारणावरून वाद झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांवर कोयता उगारला.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये हा वाद झाला. काल दुपारी साडेचार वाजता ही घटना घडलीय. इंजीनिअरिंगचा पेपर सुरू होता. नेहमीप्रमाणे विद्यार्थी पेपर देऊन घरी जात होते. त्यावेळी यातील काही तरुण कॉलेजच्या परिसरात बसून फोनवर बोलत होते.

दरम्यान एकमेकांकडे बघितल्यामुळे तसेच फोनवर मोठ्या आवाजात बोलत होते. त्यावरून या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. यातील एका गटाच्या तरुणांनी थेट त्यांच्याकडे असलेला कोयता उगारला सुदैवाने यात कुठलाही विद्यार्थी जखमी झालेला नाही. या संपूर्ण प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पुढील तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT