Suspended Crime Branch officers from Pune Police after extortion complaints by locals and business owners. saam tv
क्राईम

Pune Crime Branch: वसुली पोलीस! पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Pune Crime Branch Four Police Personnel Suspended : स्थानिक आणि व्यावसायिकांना धमक्या देणं. त्यांच्याकडे खंडणी मागणी मागणं याच्या तक्रारी मिळाल्यानंतर पुणे गुन्हे शाखेच्या पोलीस २४ युनिटमधील चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Bharat Jadhav

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

आम्हाला पैसे मागितले तर तुम्हाला धंदा करू देणार नाही, अशी व्यावसायिकांना धमकी देणाऱ्या वसुली पोलिसांवर कारवाई करण्यात आलीय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कॉप्स २४ या शाखेतील ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या पोलील कर्मचाऱ्यांविरोधात आळंदी रोड पोलिस चौकीच्या हद्दीतील लोकांनी आणि व्यावसायिकांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

पोलीस शिपाई योगेश सुरेश माळी, पोलीस शिपाई मुकेश श्रीधर बाळले, पोलिस शिपाई शंकर दत्ता धोत्रे, पोलीस शिपाई कैलास शेषराव फुपाटे असे कर्मचाऱ्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व चार कर्मचारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कॉप्स २४ या शाखेतील कर्मचारी आहेत. १३ नोव्हेंबर रोजी आळंदी रोड पोलिस चौकीच्या हद्दीतील लोकांनी आणि व्यावसायिकांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात या ४ जणांच्या विरोधात तक्रार केली होती. या पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यवसायिकांना धमकी दिली होती.

"आम्ही पोलीस आहोत, आमचे कोणी काहीही करू शकत नाही. आमच्याकडे पैसे मागितले तर तुम्हाला हद्दीत धंदा करू देणार नाही" असं म्हणत त्यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार देण्यात आली होती. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातून या चार जणांचा विरोधात कसुरी अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला होता. विशेष म्हणजे याआधी सुद्धा या चार जणांच्या विरोधात वसुली केल्याचा अहवाल पोलिस आयुक्तालयात पाठवण्यात आला होता.

कर्तव्यावर असताना बेजबाबदार, बेफिकीर व जनमाणसात पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे यांनी त्यांचे निलंबन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT