Bopdev Ghat Case Saam TV
क्राईम

Bopdev Ghat Case : बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची ओळख पटली; संशयितांचे स्केच पाहा! VIDEO

Pune Crime News : बोपदेव घाटात घडलेल्या भयंकर घटनेत पोलिसांनी आपली तपासाची चक्र वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. अशात या प्रकरणी एक मोठी अपडेट सुद्धा समोर आलीये.

Ruchika Jadhav

बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे पोलिसांना अखेर यश आलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तीन पैकी एका तरुणाला अटक केली आहे. तर इतर दोन जणांचा कसून शोध घेतला जातोय. सीसीटीव्हीची मदत घेऊन पीडित तरुणीच्या मित्राला जेव्हा सीसीटीव्ही दाखवण्यात आला तेव्हा त्याने हाच आरोपी असल्याचे सांगितले.

यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अटक केलेली असून इतर दोन जणांच्या मागावर पोलीस सध्या आहेत. मात्र पुणे पोलिसांकडून या संपूर्ण घटनेबद्दल गोपनीयता बाळगण्यात आल्यामुळे अधिकृतपणे कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिलेली नाही.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, येवले वाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना ३ संशयित तरुण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलिसांनी मात्र या बाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही. दुपारपर्यंत या संपूर्ण घटने संदर्भात आणखी एक मोठी अपडेट समोर येण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?

बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या २१ वर्षाच्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ४ ऑक्टोबरला घडली. पीडित तरुणी आणि मुलगा एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरात दुचाकीवरुन फिरायला गेले होते.

त्यावेळी घाटात गप्पा मारत थांबले असता दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. तरुणीला धमकावून घाटात असलेल्या पठारावर घेऊन गेले. यावेळी तरुणीच्या मित्राला बेल्ट आणि कपड्यांनी बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर मित्रासमोरच तिघांनी तरुणीवर बलात्कार केला आणि तिघे जण पसार झाले.

या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यात पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र आता वेगात फिरवण्यास सुरुवात केली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी या आधीच पुणे पोलिसांनी ५० हजार मोबाइल डेटा स्कॅन केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Inflation: महागाई कमी होणार? नेटकरीच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी सोमवारच्या संध्याकाळपर्यंत

Manipur Politics : भाजपला मोठा झटका; NPPने पाठिंबा काढला, मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Health Tips: झोपण्यापूर्वी गूळ खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT