Pune Crime 
क्राईम

Pune Crime: मित्रच निघाले वैरी! वाद मिटवायला गेलेल्या मित्रालाच संपवलं; मुळशीत नेमकं घडलं काय?

Pune Crime: मित्रांचं वाद मिटवणं एका व्यक्तीला महागात पडलं. वाद मिटवणल्यामुळे मित्रांनी मिळून त्याचा काटा काढल्याची घटना पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात घडलीय.

Bharat Jadhav

पुणे जिल्ह्यातील हत्यांच्या घटनांचे सत्र थांबताना दिसत नाहीये. मैत्री, भाऊ, बहिणी या नात्यातील प्रेम संपत या नात्यात वैरीपणा आलाय. मुळशी तालुक्यातील अशीच घटना घडल्याचं समोर आलंय. मित्राचा वाद मिटवण्यामुळे एकाला आपला जीव गमवावा लागलाय. भुकूम घोटावडे येथील आमलेवाडी येथे ही घटना घडलीय.

मित्रांच्या वाद मिटविण्यातून झालेल्या मारामारीत एकाचा खून झाल्याची घटना येथे घडलीय. ही घटना रविवारी रात्री घडलीय.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार भालचंद्र भिंगारे रा. ( वय 25 ), उरवडे ( ता. मुळशी ) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेश भंडलकर असं आरोपीच नाव आहे. भंडलकरने त्याच्या ७ साथीदारांनी मिळून ओंकार भिंगारेची हत्या केली.

अशी घडवली हत्या

सर्वजण १८ जुलै रोजी त्यांचा मित्र आकाश येणपूरे याच्या वाढदिवसानिमित्त उरवडे येथील एक फार्म हाऊसवर येथे जमले होते. त्यावेळी भंडलकर आणि अविनाश चव्हाण ( चिलापे) यांच्यात वाद झाला. चिलापेला खुनाची धमकी भंडलकरने दिली. यावेळी ओंकार भिंगारेने मध्यस्थी केली. त्याचा राग गणेशला आला. त्या सर्वांचा मित्र अविनाश आमले याला या भांडणाची माहिती मिळाली. त्याने हा वाद मिटवा यासाठी पुढाकार घेतला.

त्याने रविवारी घोटावडे येथे सायंकाळी सर्वांनी भेटावयाचे ठरलं. त्यावेळी भिंगारे एका मित्राला घेऊन घोटावडेतील हनुमान चौकात आला. तेथे आकाश येणपूरे आणि अविनाश आमले यांना बोलवले. तेव्हा ओंकार जाधव आणि गणेश भंडलकर आले. सर्वजण आमले याच्या आमलेवाडीतील घरी जाऊन चहा-पाणी घेत हा वाद मिटवण्याचे ठरविले. हे सर्वांची शाळेपासून मैत्री होती. मैत्रीतील वाद मिटविण्यासाठी ते घोटावडेवरून मुगावडे मार्गे पौडकडे निघाले.

पौड रस्त्याजवळील टेकडीच्या पायथ्याशी सर्वजण बसले. त्यावेळी गणेश भंडलकरने इतर चार ते पाच जणांना आधीपासूनच हाणामारी करण्याच्या उद्देशाने तेथे बोलवले होते. ते सर्वजण तेथील झुडपामागे लपले होते. मिटविण्याची चर्चा सुरू झाल्यावर पुन्हा वाद उफाळून आला. वादाचं रुपांतर मारामारीत झालं. त्यावेळी ओंकार जाधवने लपलेल्या मित्रांना बोलवले. त्यावेळेस ओंकार भिंगारे पळू लागला. त्याचा पाठलाग करून भंडलकरने पकडले आणि त्याच्या डोक्यात कोयता घातला. भिंगारे खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड आणि काट्यांनी हल्ला केला. यात ओंकार भिंगारेचा मृत्यू झाला. या हत्याकांडात एकूण ८ आरोपी असून सर्वजण फरार आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम करताहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराच्या मुलीला मारहाण, बोगस मतदान केल्याचा आरोप; VIDEO समोर

लग्नात आकर्षक लूक हवा? पाहा पैठणी साडीचे ८ युनिक डिजाईन्स; जाणून घ्या किंमत

Chanakya Niti: फसव्या महिलांना कसे ओळखावे? आचार्य चाणक्यांनी सांगितले 7 महत्त्वाचे मार्ग

माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये मतदान केंद्रावर मतदारांची उसळली मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT