Pune Shirur Crime Saam Tv
क्राईम

Shocking : धक्कादायक! पुण्यातील जोडप्याकडून तीन वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण; ५ दिवसांनी चिमुकला सापडला पंजाबमधील वृद्धश्रमात

Pune Shirur Crime : पुण्यातील शिरूर रांजणगाव एमआयडीसी परिसरातून तीन वर्षांच्या मुलाचं अपहरण करून बिहारला पळवण्यात आलं होतं. पोलिसांनी शिताफीने तपास करून चिमुकल्याची सुखरूप सुटका केली असून आरोपी दाम्पत्यला अटक करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • रांजणगाव MIDC मधून तीन वर्षांचा मुलगा आयुष अचानक गायब झाला.

  • शेजाऱ्यांनीच अपहरण केल्याचं पोलिस तपासात उघड झालं.

  • आरोपी दाम्पत्याला बिहारमधून अटक तर मुलगा पंजाबमधील वृद्धाश्रमात सापडला.

  • पुणे पोलिसांच्या धडाडीमुळे मुलाची सुखरूप सुटका झाली

पुण्याच्या शिरूर मधून धक्कदायक घटना घडली आहे. रांजणगाव एमआयडीसी परिसरातुन तीन वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण करण्यात आलं होत. या चिमुकल्याला अपहरण करून बिहारला पळून घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी चिमुकल्याच्या आईने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी काही दिवसांतच अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या असून मुलाची सुखरूप सुटका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिरूर येथील रांजणगाव MIDC औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या काजल पडघाण या महिलेचा तीन वर्षांचा मुलगा आयुष अचानक गायब झाला. १२ सप्टेंबर रोजी अपहरण झाल्यानंतर दोन दिवस वाट पाहूनही मुलगा परत न आल्याने काजल पडघाण यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरुन तांत्रिक माहिती व गुप्त बातमीच्या आधारे शोधमोहीम राबवली.

तपासाअंती पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. शेजारी राहणारे अनुजकुमार यादव आणि त्यांची पत्नी यांनीच चिमुकल्याचे अपहरण केल्याचे उघड झाले. या आरोपी दाम्पत्याला पोलिसांनी बिहारमधून अटक केली असून धक्कदायक म्हणजे अपहरण केलेल्या चिमुकल्याला या दोघांनी पंजाबमधील वृद्धाश्रमात ठेवले होते.

दरम्यान पोलिसांनी धड टाकून चिमुकल्याचा सुटका केली असून संबंधित आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या कारवाईत अखेर पोलिसांच्या तात्काळ आणि शिताफीने केलेल्या कामगिरीमुळे एका निरागस जीवाची सुखरूप सुटका झाली आहे. या घटनेनंतर पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे धडाडीच्या कारकिर्दीनंतर पुणे पोलिसांचे कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरण, न्यायाच्या मागणीसाठी बीडमध्ये कॅण्डल मार्च

Free Homes Mumbai: सर्वसामान्य मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होणार; ८,००० कुटुंबांना विनामूल्य मिळणार ५०० चौरस फुटांची घरे

Veen Doghantali Hi Tutena: मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच होणार 'बीच वेडिंग', समर-स्वानंदीच्या नात्याची नवी सुरुवात

Maharashtra Politics: 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग; 4 माजी आमदार गळाला

Election Commission: देशातील कोणत्या १२ राज्यात होणार SIR 2.0; कोण-कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक? जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT