Crime News Saam Tv
क्राईम

Pune Woman Harassment : समृद्धी महामार्गावर भीतीचे सावट! पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने महिलेची काढली छेड

Crime News : बुलढाण्यात एका महिलेची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • बुलढाणा जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर पुण्यातील महिला कर्मचाऱ्याची छेडछाड

  • आरोपी पेट्रोल पंप कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

  • रात्रीच्या प्रवासादरम्यान ही घटना घडली आहे

  • समृद्धी महामार्गावर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पुण्यातून क्रूरतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे. शहरातील नामांकित कंपनीतील एका महिलेची बुलढाण्यातील पेट्रोल पंपवर छेड काढण्यात आली. या प्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेचं नाव सरिता (बदलेलं नाव) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरिता पुण्यातील एका नामांकित कंपनीत कर्मचारी आहे. ती रात्रीच्या सुमारास दिवाळीनिमित्त एका खाजगी टॅक्सीने पुण्याहून मध्य प्रदेशातील आपल्या गावाला जात होती. यादरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील बीबी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर सरिता रिफ्रेशमेंटसाठी थांबली. यावेळेस पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याने कोणी नसल्याचे पाहून संधी साधून सरिताची छेड काढली.

सरिताने आरडाओरडा केला मात्र रात्रीची वेळ असल्याने आणि आजूबाजूला कोणी नसल्याने तिच्या मदतीला कोणी धावून आले नाही. त्यांनंतर सरिताने तात्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधून मदत मागितली. त्यानुसार बीबी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ पेट्रोल पंपावर दाखल झाले. पोलिसांनी घडलेल्या घटनेचा आढावा घेत पेट्रोल पंपावरील छेड काढणाऱ्या आकाश इंगळे या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपी आकाशवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेनंतर पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये खाजगी बस आणि एसटी बसचा अपघात

Bihar : बिहारच्या राजकारणाला धक्कादायक वळण; स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या JMM ची निवडणुकीतूनच माघार

Parbhani Crime: जंगालात फिरणाऱ्या जोडप्याला ६ जणांनी घेरलं; तरुणासमोरच तरुणीवर सामूहिक अत्याचार, बलात्कारानंतर...

Shaniwar Wada Namaz Row : खासदार मेधाताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही; राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे कडाडल्या

Cholesterol Facts: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT