Maharashtra crime news Saam Tv
क्राईम

Baramati crime news: जबरदस्ती वाहनामध्ये कोंबलं, बेदम मारहाण केली आणि...; कारण ठरली बायको, तरुणासोबत भयंकर घडलं?

Maharashtra crime news: बारामतीत किरकोळ वादातून तरुणाचे अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून एक आरोपी अटकेत आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुकमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीये. एका तरुणाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याच्यावर मारहाण आणि दमदाटी केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यापैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक करणयात आलीये.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव पिंटू उर्फ शरद यशवंत धुमाळ असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना किरकोळ वादातून घडली असल्याचं समोर आलंय. आरोपी पिंटू उर्फ शरद धुमाळ यांच्या पत्नीला अपशब्द वापरल्याच्या कारणावरून हा वाद पेटला. या वादातून फिर्यादी प्रतीक राजेंद्र धंगेकर याला आरोपींनी जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि त्यानंतर त्याला मारहाण करत दमदाटी केली.

या घटनेनंतर प्रतीक धंगेकर यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पिंटू उर्फ शरद यशवंत धुमाळ, भारत मोहिते, अक्षय सोनवणे आणि अधिराज मोरे या चौघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत पिंटू उर्फ शरद धुमाळ याला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेला पिंटू उर्फ शरद धुमाळ हा बारामती तालुक्यातील कोऱ्हळे बुद्रुक याठिकाणचा रहिवासी आहे. तर इतर आरोपींपैकी भारत मोहिते आणि अक्षय सोनवणे हे इंदापूर तालुक्यातील शेळगावमधील असल्याचं समोर आले आहे. तर आरोपी अधिराज मोरे याचा शोध पोलीस घेतायत.

दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास बारामती तालुका पोलीस करत असून, उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 : कोलकाताचा मुंबईवर ४ गडी राखून विजय, प्लेऑफसाठी केकेआरच्या आशा कायम

Donald Trump Bull: ७०० किलोचा 'ट्रम्प रेडा', नेमका आहे तरी कोण?

राज्यातील पेट्रोल टंचाई जीवावर उठली; पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

डिझेल नाही म्हणणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होणार; CM फडणवीस यांनी दिली माहिती, VIDEO

भारताच्या राजकारणात नव्या पक्षाची एन्ट्री, २ दिवसांत झाले ५० लाख सदस्य; कोण आहे संस्थापक?

SCROLL FOR NEXT