Shocking domestic violence case from Chhattisgarh: Police investigate the brutal killed of a pregnant woman allegedly by her husband. saam tv
क्राईम

नवऱ्याची क्रूरता... बेदम मारहाण करत बायकोच्या गुप्तांगामध्ये घातले 10 इंच ब्लेड

Pregnant Wife Killed By Husband In Surguja Chhattisgarh: छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्यात घडलेल्या धक्कादायक घटनेत पतीने आपल्या गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Omkar Sonawane

छतीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक व्यक्तीने आपल्या 23 वर्षीय गर्भवती पत्नीची निर्घृणपणे हत्या केलाचा आरोप आहे. या नराधमाने आधी बायकोला बेदम मारले आणि नंतर तिच्या गुप्तांगात हेक्सा ब्लेड घुसवले. यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्या नराधमाला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 14 मेला घडली असून आरोपीचे नाव प्रदीप आगरिया असे आहे. रविवारी त्याला अटक केली असून त्याने गुन्हा कबूल केला आहे. प्राथमिक तपासात समोर आले की, प्रदीप आणि हिराबाईचे लग्न पाच वर्षांपूर्वी झाले होते. तो नेहमीच घरी दारू पिऊन यायचा आणि नशेमध्ये बायकोला बेदम मारायचा. त्या दिवशी तो नशेमध्ये होता आणि आपल्या मुलीसमोरच त्याने बायकोची हत्या केली.

नंतर स्वतः घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये...

पोलिसांनी सांगितले की, गंभीर जखमी झाल्यानंतर हिराबाई बेशुद्ध पडली त्यानंतर प्रदीपने स्वतः बाईकवर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि डॉक्टरांना सांगितले की, माझ्या बायकोचा अपघात झालाय. मात्र तपासणीदरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बायकोचा मृत्यू झाल्याचे समजताच हा क्रूर नवरा तिथून पळून गेला. त्यानंतर तिचे आई वडिलांनी तेथे पोहोचताच पोस्टमार्टम केले गेले, आणि त्यामध्ये भयानक सत्य समोर आले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे फिरवली आणि प्रदीपच्या मुसक्या आवळल्या.

गुप्तांगामधून काढले 10 इंच लोखंडी अवजार

रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की,सदर महिला ही तीने महिन्याची गरोदर होती. तिच्या शरीरावर तब्बल 17 गंभीर वार होते. तसेच तिच्या गुप्तांगामधून 10 इंच ब्लेड निघाले जे की लाकडी साहित्य कापण्यासाठी वापरले जाते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली नराधम प्रदीपला फाशीची शिक्षा द्या अशी आक्रमक मागणी तिच्या आई वडिलांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र प्रवास, शिंदेसेना अस्वस्थ? ठाकरेंची उच्चस्तरीय चर्चेची गुगली

Accident: नाशिकमध्ये अपघाताचा थरार! एसटी बसने बापलेकाला चिरडलं, मुलाच्या डोळ्यासमोर वडिलांनी सोडले प्राण

ठाकरेंना हवा भाजपमुक्त राम, राम मंदिरातील चोरीविरोधात ठाकरेसेनेचं आंदोलन

Ketan Agarwal Case: 'लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणं सोपं वाटलं', सियाची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली

Crime: बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारत संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT