pregnancy test racket busted dr satish sonawane arrested Saam Digital
क्राईम

संभाजीनगर : गर्भपात प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, युवतीला महिन्याला मिळत हाेते 4 लाख; मास्टरमाइंड काेठडीत

Chhatrapati Sambhajinagar Crime News : या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी 14 आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यातील 11 जणांना अटक केली आहे. त्यात एक अल्पवयीन आहे.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

मेडिकलला असतानाच डॉ. सतीश सोनवणेने याने गर्भपाताचे कारनामे सुरू केले होते अशी धक्कादायक माहिती साेनवणे याला अटक केल्यानंतर समाेर आली आहे. दरम्यान गर्भलिंग निदानासाठी युवतीला (आराेपी साक्षी थाेरात) महिन्याकाठी 4 लाख रुपये दिले जात हाेते देखील आता उघड झाले आहे. साेनवणे यास न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणातील मास्टरमाइंड असलेला डॉ. सतीश सोनवणे हा एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकत असतानाच गर्भपात प्रकरणात अडकला. त्यानंतर त्याने शिक्षण सोडून अवैध गर्भपाताचे रॅकेट सुरू करून गोरख धंदा सुरू केला. अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर तो डॉक्टर नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी एजंट सतीश किसनराव टेहरे हा संभाजीनगर शहरातील नामांकित स्त्री रोग तज्ञांच्या रुग्णालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करायचा.त्याच दरम्यान साक्षी थोरातला गर्भलिंग चाचणी करण्याचे टेहरेने शिकवले आणि सोनोग्राफी करून मुलगी असल्याचे सांगायचे.

तो साक्षीला महिन्याकाठी 4 लाख रुपये देत असल्याचही पोलिस तपासात समोर आले आहे.. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी 14 आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यातील 11 जणांना अटक केली आहे. त्यात एक अल्पवयीन आहे. या प्रकरणातील भोकरदन मधील बोगस डॉक्टर बालाजी तळेकर आणि काकासाहेब खेकाळे या दाेघांचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day Special : स्वातंत्र्यदिन होईल खास! घरीच झटपट बनवा तिरंगा पुलाव

Shocking : विहिरीत आढळला २८ वर्षीय महिलेसह दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह, आत्महत्या की घातपात?

Left Handedness People: डावखुऱ्या लोकांमध्ये असतात 'हे' खास गुण, कसे ओळखावे?

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये 15 ऑगस्टला शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला खाटीक समाजाचा विरोध

Minimum Balance : खातेधारकांनो लक्ष द्या! 'या' तीन बँकांचा नवा नियम लागू, खात्यात 'इतकी' रक्कम नसेल तर लगेच बसणार दंड

SCROLL FOR NEXT