pregnancy test racket busted by kolhapur police arrests four along with doctor Saam Digital
क्राईम

Kolhapur: बेकायदेशीर गर्भपात केल्याचा संशय, काेल्हापुरात डॉक्टर अटकेत; दाेघांकडून गर्भलिंग निदानाचे साहित्य जप्त

Kolhapur Latest Marathi News : गारगोटी परिसरात गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेट सुरू असल्याचा पोलिसांना संशय हाेता. ताे पाेलिसांच्या कारवाईतून खरा ठरला.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या संशयावरून तीन एजंट व एका डाॅक्टरला काेल्हापूर पाेलिस दलाने अटक केली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार डॉ. हर्षल रवींद्र नाईक-परुळेकर असे अटक केलेल्या वैद्यकीय अधिकारी याचे नाव आहे. या कारवाईत गर्भपात करण्यासाठीच्या गोळ्या, पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि गर्भलिंग निदानासाठीचे इतर साहित्य पाेलिसांनी जप्त केले आहे. (Maharashtra News)

पाेलिसांनी प्रयाग चिखली येथील एजंटकडून बेकायदेशीर गर्भपात करण्यासाठीच्या गोळ्या तसेच मडिलगे येथील एजंटकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि गर्भलिंग निदानासाठीचे इतर साहित्य जप्त केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गारगोटी परिसरात गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेट सुरू असल्याचा पोलिसांना संशय हाेता. ताे या कारवाईतून खरा ठरला.

या कारवाईत युवराज गोविंद चव्हाण (वय ३९, रा. प्रयाग चिखली, ता. करवीर), संजय कृष्णात पाटील (भोई गल्ली, वरणगे पाडळी, ता. करवीर), डॉ. हर्षल रवींद्र नाईक-परुळेकर (गंगा लॉनजवळ, फुलेवाडी रिंगरोड), विजय लक्ष्मण कोळसकर (मडिलगे खुर्द, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) यांना अटक केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. अधिक तपास सुरु असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

Param Sundari vs Baaghi 4 : सिद्धार्थ मल्होत्रा अन् टायगर श्रॉफमध्ये कांटे की टक्कर, 'बागी ४'नं ओपनिंग डेलाच केली बक्कळ कमाई

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

Ganpati Visarjan 2025: मुंबई ते दिल्ली गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी 'हे' आहेत शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT