Nagpur Viral Video Saam TV
क्राईम

Nagpur Viral Video : अंगावर थुंकणाऱ्या पोलिसाची दांपत्यानं लाज काढली; नागपुरातील VIDOE व्हायरल

Viral Video : नागपुरात एक पोलिस कर्मचारी सिग्नलवर दुचाकी घेऊन उभे असलेल्या दांपत्याच्या अंगावर थुंकल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ruchika Jadhav

इतरवेळी नागरिकांना शिस्तीचे आणि व्यवस्थित वागण्याचे नियम शिकवणाऱ्या पोलिसांनी स्वत: स्वच्छतेचे नियम पाळणे सुद्धा गरजेचे असते. मात्र नागपुरात पोलिसांची एक किळसवाणी घटना समोर आली आहे. रस्त्याने जाणाऱ्या एका दांपत्याच्या अंगावर पोलीस वॅनमधील एका कर्मचाऱ्याने थुंकले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील लक्ष्मी नगर चौकात एक जोडपे सिग्नलवर थांबले होते. त्यावेळी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 चे पोलिसांचे वाहन देखील त्यांच्या शेजारी उभे होते. वाहन उभे असताना एक पोलीस वाहनाच्या खिडकून खर्रा खाऊन बाहेर थुंकला. त्याची थुंकी थेट समोर दुचाकी घेऊन उभे असलेल्या दांपत्याच्या अंगावर उडली. असे झाल्याने दांम्पत्य पोलिसांना ओरडू लागले मात्र त्यावेळी काहीही प्रतिक्रिया न देता सिग्नल सुटताच पोलिसांचे वाहन तेथून पुढे निघाले.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या घटनेमुळे दांपत्याचा संताप झाला आहे. तुमच्या अंगावर कुणी असं थुंकलं तर तुम्ही शांत रहाल का? असा प्रश्न व्यक्ती पोलिसांना विचारत आहे. तसेच असं वागताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असंही अशा शब्दांत या व्यक्तीने पोलिसांना खडेबोल सुनावले आहेत.

विशेष म्हणजे "रस्त्यावर थुंकणाऱ्यांचे फोटो काढून वर्तमानपत्रात प्रसिद्ध करा" असं 'स्वच्छता सेवा अभियाना'च्या समारोपवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल वक्तव्य केलं होतं. त्यात पोलिसांनीच असं कृत्य केल्यावर काय करावं असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

Sambhajinagar News : उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगास नोटीस; १५ लाख स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मतदानाचा प्रश्न

SCROLL FOR NEXT