dhule Saam TV
क्राईम

धुळे : दाेन लाखांच्या गुटख्यासह एकास अटक, एलसीबीची कारवाई

Dhule Crime News : संबंधिताच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी दुकान मालकास ताब्यात घेत कारवाई केली आहे.

भूषण अहिरे

Dhule :

घरामध्ये अवैधपणे गुटख्याची साठवणूक करून ठेवणाऱ्या किराणा माल विक्री करणा-या दुकानदारास धुळे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याकडून जवळपास 2 लाख 9 हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (dhule local crime branch) ही कारवाई केली आहे. (Maharashtra News)

धुळे शहरातील साक्री रोड परिसरामध्ये एका दुकान मालकाकडे घरामध्ये अवैधपणे गुटख्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने गुटखा साठवणूक करून ठेवल्याची खात्रीशीर सूत्रांकडून पोलिसांना माहिती मिळाली होती. त्याबाबत निनावी तक्रारी देखील हाेत्या.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी पथकासह छापा टाकला. संबंधिताच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी हा संपूर्ण गुटख्याच्या साठ्यासह संबंधित दुकान मालकास ताब्यात घेत कारवाई केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये; सरेंडरसाठी ४ दिवसांचा वेळ मागितला, पण...

'ED ने राहुल गांधींची बदनामी केली', मुंबईत काँग्रेस आक्रमक, थेट कार्यालयावर मोर्चा

Kitchen Hacks : घरात पंख्यावर खूपच धुळ बसली? मग 'या' सिंपल ट्रिक्सने करा स्वच्छ

White Sesame Seeds Benefits: थंडीत रोज सकाळी एक चमचा सफेद तीळ खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update: निवडणूक आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एक्साईज विभागाची धडक कारवाई, ७० लाखांचा बेकायदेशीर दारू साठा जप्त

SCROLL FOR NEXT