police investigate gautam gaurav and shahaji kakade about firing case of nimbut near baramati Saam Digital
क्राईम

बारामतीत रणजीत निंबाळकरांवर गोळीबार, काकडे पिता-पुत्र पोलिसांच्या ताब्यात; कारणंही आलं समाेर (पाहा व्हिडिओ)

police investigate gautam gaurav and shahaji kakade about firing case of nimbut near baramati : पाेलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मंगेश कचरे

निंबुत (ता. बारामाती) येथे झालेल्या गाेळीबार प्रकरणी सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचे चिंरजीव गौतम व गाैरव यास पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. शर्यतीच्या बैलाच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेत फलटणचे रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनूसार गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजीत निंबाळकर यांचा शर्यतीचा बैल खरेदी केला होता. हा खरेदी केलेला बैल निंबाळकर यांनी परत हवा हाेता. काकडे यांनी त्यास नकार दिला. त्यातून वादाला ताेंड फुटले.

निंबाळकर हे गुरुवारी गाड्यातून मोठ्या प्रमाणात लोक घेऊन गौतम काकडे यांच्या घरी गेले हाेते. तेथे झालेल्या वादाचे पर्यवसन गोळीबारात झाले. या घटनेत रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर पोलिसांनी गौरव काकडे, शहाजी काकडे आणि मुलगा गौतम काकडे या तिघांना ताब्यात घेतले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे पिछाडीवर, महेश सावंत आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT