Kalyan Crime News Saam Tv
क्राईम

Kalyan Crime News: संदीप राठोड हत्याकांडाचा झाला उलगडा, चौघे हल्लेखोर गजाआड; काय आहे प्रकरण?

Kalyan News: कल्याणमध्ये संदीप राठोड या तरुणाची हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण प्रतिनिधी

कल्याण पूर्व 100 फूट रोड चौकात संदीप राठोड या तरुणाची पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस आणि कल्याण क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. शैफ उर्फ साहिल शेख आणि विद्यासागर मूर्तील उर्फ अण्णा, पेंद्या उर्फ अरविंद गाळपांडे, अशी अटक आरोपींची नावे आहेत.

मयत संदीप राठोड देखील सराईत गुन्हेगार होता. तर अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून पेंद्या उर्फ अरविंद विरोधात याआधी देखील गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर कल्याण पूर्व येथील वाढते गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वत गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याने नागरिक दहशतीच्या छायेत आहेत. टवाळखोर, गुंड प्रवृत्तीच्या तरुणांकडून खुलेआम राडे, हाणामाऱ्याचे प्रकार घडत असल्याने वाढत्या गुन्हेगारी आळा घालण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी कल्याण पूर्व 100 फूट रोड चौकात संदीप राठोड या तरुणाची पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केल्याची घटना घडली होती.

ऐन सायंकाळी गर्दीच्या वेळी भरचौकात झालेल्या या हत्येच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला मयत संदीप राठोड हा देखील सराईत गुन्हेगार होता. त्याच्या विरोधात याआधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. संदीपची हत्या कोणी केली व का केली? याचा तपास पोलीस करत होते.

कल्याण कोळसेवाडी पोलिसांचे पथक व कल्याण क्राईम ब्रांचचे पथक पोलीस आरोपींच्या शोधात होते. अखेर या हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. शैफ उर्फ साहिल शेख आणि विद्यासागर मूर्तील उर्फ अण्णा, पेंद्या उर्फ अरविंद गाळपांडे या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं. ही हत्या पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून झाली असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात याआधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM थलपती विजय यांच्यानंतर आणखी एक अभिनेता येणार राजकारणात; चर्चांना उधाण

Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

ताप किती अंश धोकादायक आहे? या किरकोळ समस्या हलक्यात घेऊ नका

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे बर्निंग डंपरचा थरार

समृद्धी महामार्गावर १२ दिवस वाहतूक ब्लॉक; प्रवास करण्याआधी वेळापत्रक पाहा

SCROLL FOR NEXT