police arrests two in sand theft case wardha saam tv news
क्राईम

Wardha Crime News : वाळू चोरणारे दोघे अटकेत, तिघांचा शाेध सुरु; 3 ट्रॅक्टरसह लाखाे रुपयांचा वाळूसाठा जप्त

पाेलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News

वर्धा जिल्ह्यात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पाेलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी अऩ्य तिघांचा शाेध सुरु आहे. पोलिसांनी 3 ट्रॅक्टरसह १८ लाख १५ हजार रुपयांचा वाळूसाठा जप्त केला आहे. (Maharashtra News)

मेनखात शिवारातील वणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून त्याची ट्रॅक्टरने वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी जाम ते मेनखात रस्त्यावर सापळा रचून नाकाबंदी केली असता तीन ट्रॅक्टर येताना दिसले. पोलिसांनी पाहणी केली असता ट्रॅक्टरमध्ये वाळू दिसून आली.

याप्रकरणी पोलिसांनी चालक मनोज कुंडलिक उईके (रा. मेनखात), सूरज सुरेश घोटे (रा. किन्हा खरडा) यांना अटक केली. ट्रॅक्टर मालक अजू खेडेकर (रा. जाम), होमलाल जगरा (रा. हिंगणघाट), धिनज मारोती मडावी (रा. उब्दा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT