Pimpri Chinchwad  Saam Tv
क्राईम

Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये गावगुंडांची दहशत; वाईन शॉप चालकावर कोयत्याने हल्ला

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा गावगुंडांची दहशत पाहायला मिळाली आहे. स्थानिक गावगुंडांच्या टोळक्याने किरकोळ वादातून वाईन शॉप चालकावर कोयत्याने आणि दगडाने हल्ला केला.

Bharat Jadhav

(गोपाल मोटघरे, पुणे)

Pimpri Chinchwad Goons Attacked Wine Shopkeeper:

चिंचवड गावातील पूजा वाईन्स या ठिकाणी काही वेळापूर्वी ही धक्कादायक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये देखील कैद झाली आहेत. वाईन शॉपमध्ये बिल घेण्याच्या वादातून स्थानिक गावगुंड आणि वाईन शॉप चालकांमध्ये वादावादी झाली. याच वादातून गावगुंडांच्या टोळक्याने सुरुवातीला वाईन शॉप चालकावर तसेच वाईन शॉपमधील कामगारांवर लाथाबुक्याने मारहाण करून दगडाने हल्ला केला. (Latest News)

त्यानंतर एका गावगुंडाने त्या ठिकाणी येऊन कोयत्याने वाईन शॉप चालक आणि वाईन शॉपच्या कामगारांवर हल्ला केला. या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून वाईन शॉप चालकाच्या फिर्यादीवरून चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक गावगुंडाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम चिंचवड पोलीस करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


गेल्या काही दिवसांपूर्वी चिखली गावात भरदिवसा एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. सोन्या तापकीर असे मृत तरुणाचे नाव होतं. चिखली गाव येथे बस स्टॉपच्या जवळ रहदारीची ठिकाणी सोन्या तापकीर याच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. यात सोन्या गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणयात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मावळ तालुक्यातील एका उद्योजकाची हत्या करण्यात होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT