Pimpari Chinchwad News: Saamtv
क्राईम

Pimpari Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडमध्ये गावगुंडांचा धुमाकूळ, ७- ८ वाहनांची तोडफोड केल्याने खळबळ

Pimpari Chinchwad News: पिंपरी चिंचवड शहरातील बिजली नगर भागात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड झाली आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

गोपाल मोटघरे

Pimpari Chinchwad Crime:

पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरात वाहन तोडफोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. असाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून पिंपरी चिंचवड शहरातील बिजली नगर भागात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड झाली आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (Crime News in Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गावगुंडांच्या टोळक्याने पिंपरी चिंचवड परिसरातील बिजली नगर भागात जवळपास सात आठ माल वाहतूक करणाऱ्या चार चाकी वाहनांची तोडफोड केली आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून गावगुंड्याच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी गावगुंडाच्या टोळक्याने ही वाहनांची तोडफोड केली आहे. या प्रकरणात चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक नागरिकांनी तक्रार दाखल केली असून वाहनांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडांचा शोध चिंचवड पोलीस घेत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, नागपूरमध्येही वाहनांची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाने सात वाहनांची तोडफोड केल्याने खळबळ उडाली आहे. मुजफिर हुसेन झाकीर हुसेन असे आरोपीचे नाव असून त्याला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रेल्वे स्थानकावर बुलेटची पार्किंग न मिळाल्याने हे कृत्य केल्याची कबुली या आरोपीने दिली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gavhachi Khichdi Recipe: जेवणासाठी काहीतरी झटपट आणि पौष्टीक खायचंय? बनवा गरमागरम गव्हाची खिचडी, वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: हडपसरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांचा चोप; गांधी चौकात रात्री घडला थरार

मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली अन् पुढच्या मिनिटाला ३ मोठ्या निर्णयांवर सह्या, थलपती विजय ठरले 'नायक'

Firing in Lucknow: भाजपच्या नेत्यावर अंदाधुंद गोळीबार; पोलीस स्टेशनजवळ घडलेल्या रक्तरंजित थरारानं लखनौ हादरलं

Nashik : झोपलेल्या शेतकरी दांपत्यावर अ‍ॅसिड हल्ला; नाशिकमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT