Crime News Saam tv
क्राईम

Crime news India: IRS ऑफिसरच्या मुलीची हत्या; आधी लैंगिक अत्याचार, नंतर मोबाइलच्या चार्जरने गळा आवळला

South Delhi news: दिल्लीतील अमर कॉलनीमध्ये २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचाराचा संशय व्यक्त होत असून पोलिसांनी माजी नोकरावर संशय घेत तपास वेगाने सुरू केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. दक्षिण-पूर्व दिल्लीतील अमर कॉलनी परिसरात एका तरूणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. २२ वर्षीय तरूणीच्या या हत्येने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. इतकंच नाही तर पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची देखील शंका व्यक्त करण्यात येतेय.

बुधवारी सकाळी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज म्हणजेच बुधवारी सकाळी घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी तरूणीचा मृतदेह तिच्या घरी सापडला आहे. ही तरूणी IRS ऑफिसरची मुलगी असल्याचंही समोर आलंय.

पोलिसांनी सांगितलं की, या तरूणीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. पहिल्यांदा या तरूणीवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर मोबाईल चार्जरच्या केबलने तिचा गळा आवळण्यात आल्याचा संशय आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

घरातील नोकरावर संशय

या प्रकरणात संशयाची सुई ही घरात काम केलेल्या नोकरावर आहे. या नोकराला दीड महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे बदला घेण्याच्या हेतूने त्याने हे चुकीचं कृत्य केलं असल्याची शंका आहे.

बुधवारी सकाळी तरूणीचे आई-वडील जीमसाठी म्हणून घराबाहेर गेले होते. त्याचवेळी आरोपीने हा डाव साधल्याची शक्यता आहे. पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक टीमला घरी धाडलं आणि महत्त्वाचे पुरावे गोळा केलेत. याशिवाय परिसरातील सीसीटीव्हीचं फुटेज तपासण्यात येतंय.

युपीएससीची तयारी करत होती तरूणी

हत्या झालेल्या तरूणीने इंजिनियरींगचा शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर आता ती युपीएससीची तयारी करत होती. ज्या नोकरार संशय व्यक्त केला जातोय तो मुळचा राजस्थानचा रहिवासी असल्याची माहिती आहे. आणि या नोकराला काही दिवसांपूर्वीच कामावरून काढून टाकल्याची माहिती आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसंच संशयित आरोपीच्या शोधासाठी खास पथकं तयार करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, आमचे प्रयत्न सुरु असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT