Nashik Crime News 
क्राईम

Nashik : नाशिक हादरले! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, घरात घुसून ५ जणांनी केले कुकर्म

Nashik sexual harassment minor : नाशिकमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी बलात्कार केला आहे. नाशिकमध्ये सध्या संतापाची लाट आहे.

Namdeo Kumbhar

अभिजित सोनवणे, नाशिक प्रतिनिधी

Nashik Crime News : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. घरात घुसून नराधमांनी मुलीच्या शरीराचे लचके तोडले. कुणाला सांगू नये म्हणून त्या नराधमांनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे नाशिक हादरले आहे. नाशिकच्या ओझर टाऊनशिपमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कार केल्यानंतर पाच संशयित आरोपी फरार झाले आहेत. या धक्कादायक घटनेनंतर नाशिकमधील ओझर टाऊनशिप परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

ओझर टाऊनशिपमध्ये पाच नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांची तीन ते चार पथके आरोपींचा शोध घेत आहेत. सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे नाशिकमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील गुन्हेगारी कधी संपणार? असा सवाल सर्वसामान्य विचारत आहेत.

मुलगी घरात एकटी असल्याचे पाहिले अन् पाच नराधमांनी डाव साधला. आई मजुरी काम करण्यासाठी गेली होती, त्यामुळे मुली घरात एकटीच होती. हाच डाव साधत पाच जणांनी घरात घुसून कुकर्म केले. नराधमांनी अल्पवयीन मुलीच्या शरीराचे लचके तोडले. या प्रसांगाबाबत कुणाला सांगितले तर जिवे मारून टाकू अशी धमकी त्या आरोपींनी मुलीला दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar : मुंबईत ४०-५० मजली इमारती; त्यात मराठी माणूस कुठेच दिसत नाही; शरद पवारांनी काढलं नव कार्ड?

अरे बापरे! पुराचं आक्राळविक्राळ रूप, कचाट्यात सापडली थार | VIDEO

GST Reforms: दूध, दही, टीव्ही, फ्रिज होणार स्वस्त? मोदी सरकार देणार गिफ्ट

Maharashtra Live News Update: दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील घटना

६-७-८-९ नाही, १० थरांचा विश्वविक्रम; जय जवान पथकाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणारं कोकण नगर गोविंदा पथक नेमकं कुठलं?

SCROLL FOR NEXT