Crime News SaamTv
क्राईम

Mumbai Crime : बाप नव्हे हैवान ! पोटच्या मुलीवर बापाने केला अत्याचार; पीडितेच्या मृत्यूनंतर धक्कादायक घटना उघडकीस

Nalasopara Crime News: मुंबईजवळील नालासोपारामधून बाप- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nalasopara Crime News

बाप- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना मुंबईजवळील नालासोपारा येथे घडली आहे. नराधम बापानेच आपल्या २२ वर्षीय मुलीवर अत्याचार केले. मुलगी गंभीर आजाराने ग्रस्त असतानाही बापाने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने धाडस दाखवून पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपासून क्षयरोगाने त्रस्त असलेली पीडित तरुणी नालासोपारा पश्चिममध्ये आपल्या वडीलांसह वास्तव्यास होती. याची नराधम बापाला माहिती असूनही तिच्यावर तो सातत्याने अत्याचार करत होता. धक्कादायक म्हणजे तरुणीची प्रकृती ढासळत असतानाही हा प्रकार सुरूच होता. गंभीर आजाराने त्रस्त आणि नराधम बापाचा अत्याचार सहन करणाऱ्या या पीडित तरुणीला ११ नोव्हेंबर रोजी जे जे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली.

नराधम बाप पीडितेला घरात डांबून ठेवून मारहाणही करत होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे पीडित तरुणी आणि तिची आई प्रचंड घाबरल्या होत्या. त्यांनी या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. पीडिता गरोदरही राहिली होती. तिचा गर्भपातही करण्यात आला होता, असा आरोप तक्रारीद्वारे केला आहे.

मात्र मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी नालासोपारा पोलिसांकडे अत्याचाराची तक्रार केली. नराधम बापाच्या मारहाण आणि शारीरिक अत्याचारामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी आरोपी बापावर विविध कलमाअन्वये गुन्हे दाखल केले असून त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT