panvel police arrests gang of 5 in theft case at mumbai pune expressway Saam Digital
क्राईम

Mumbai- Pune Expressway: मुंबई पुणे महामार्गावर लुटमार करणारी टोळी अटकेत; 5 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त

panvel police arrests gang of 5 in theft case at mumbai pune expressway : पनवेल पाेलिसांच्या धाडसी कामगिरीचे नागरिकांकडून तसेच समाज माध्यमातून काैतुक हाेऊ लागले आहे.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

मुंबई पुणे महामार्गावर दरोडा टाकून लुटमार करणारी चाैघांची टाेळी पनवेल तालुका पाेलिसांनी नुकतीच जेरबंद केली. या टाेळीतील चाैघांकडून एकूण 5 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टाेळाकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई पुणे महामार्गावर पळस्पे जवळ आपल्या मालवाहतूक वाहनाचे टायर तपासात असताना 5 ते 6 जणांनी हल्ला करत रोख रक्कम आणि एक मोबाईल चोरी झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविला गेला हाेता.

या प्रकरणाचा तपास करत असताना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती नुसार पोलिसांनी सापळा रचत मुख्य संशयित आरोपी विशाल जाधव याला अटक केली. जाधव याची अधिक चौकशी केली असता गुन्ह्यातील इतर चार संशयितांना आरोपींनी अटक करुन त्यांच्याकडून या गुन्ह्यात चोरी केलेल्या एका मोबाईलसह इतर गुन्ह्यात चोरलेले 21 मोबाईल गुन्ह्यात वापरलेली बाईक, हत्यार असे एकूण 5 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला धक्का! आमदाराचे काका शिंदे गटाच्या वाटेवर, एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार

horrific accident : स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात दुर्घटना; शाळेचं छत कोसळलं, एका मुलीचा मृत्यू

PF Withdrawal : नोकरी करतानाही पीएफचे पैसे काढता येतात! नियम आणि अटी जाणून घ्या

WhatsApp Banned: 'या' चुका आताच टाळा, नाहीतर तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट होईल बॅन

Maharashtra Live Update: शक्तीपीठासाठी मोजणी झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू - राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT