One-month-old baby in Nalasopara garbage Saam Tv News
क्राईम

Virar Crime : लघूशंकेला गेले असता बाळाचा आवाज, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बघताच पायाखालची जमीन सरकली

Virar Crime News : नालासोपाऱ्यातील कळम खाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क एक महिन्याचं बाळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आलं आहे. नवजात बाळ सापडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Prashant Patil

विरार : नालासोपाऱ्यातील कळम खाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क एक महिन्याचं बाळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आलं आहे. नवजात बाळ सापडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लघुशंकेला गेलेला तरुणाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हे बाल रडत असल्याचं दिसून आलं होतं. त्याने तात्काळ ११२ या नंबरवर फोन करून बाळाच्या संदर्भात पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी अर्नाळा पोलीस आणि नालासोपारा पोलीस दाखल होऊन बाळाला प्राथमिक उपचारासाठी वसई विरार महानगर पालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. बाळाची स्थिती ही उत्तम असल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण गाडगीळ यांनी दिली आहे.

मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी अचानक रडू लागलं

दरम्यान, अशीच घटना बीड जिल्ह्यामध्ये उघडकीस आली आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात एक धक्कादायक आणि तेवढाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. महिलेची प्रसूती झाल्यानंतर जन्मलेले बाळ मृत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. नातेवाईकांनी हे बाळ घेऊन आपल्या गावी अंत्यसंस्काराची तयारी केली. परंतु ही तयारी सुरू असतानाच बाळ रडू लागले. यामुळे नातेवाईकांनी परत त्याच रुग्णालयात धाव घेत या बाळाला अतिदक्षता कक्षात दाखल केलं.

या प्रकाराची रुग्णालयात चर्चा होत असून आता यामध्ये दोषी असलेल्या डॉक्टर वर कारवाई करण्याची देखील मागणी होत आहे. केज तालुक्यातील होळ येथील घुगे कुटुंबाबाबत ही घटना घडली आहे. घुगे कुटुंबाने अद्याप या प्रकरणाची कुठलीही तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केलेली नाही. परंतु हा घडलेला प्रकार नेमका कशामुळे घडला? यामध्ये दोषी कोण? याची चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Pune Theft Case : फिरण्यासाठी घराबाहेर पडले, तो आला अन् हातसाफ करून गेला; मेहुण्याचे अडीच लाखांचे दागिने चोरले

Kapil Sharma: कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारानंतर कपिल शर्माने व्यक्त केलं दुख; म्हणाला, 'आम्हाला धक्का बसला आहे पण...'

Chandu Chavhan : बडतर्फ चंदू चव्हाण देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात; बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Ratnagiri : राजापूरमध्ये मुसळधार पाऊस; अर्जुना धरण ओव्हरफ्लो | VIDEO

SCROLL FOR NEXT