Kidnapping Video x
क्राईम

Kidnapping : निर्जन रस्ता, मिट्ट काळोख, ट्रक रिव्हर्स घेतला; ड्रायव्हरनं महिलेला उचललं अन्..; अपहरणाचा थरारक Video

Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक ट्रक चालक महिलेचे अपहरण करत असल्याचे पाहायला मिळते. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Yash Shirke

  • दुकानाजवळ उभ्या असलेल्या महिलेचे अपहरण

  • ट्रक चालकाने महिलेला ट्रकमध्ये ढकललं

  • घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ होतोय व्हायरल

Kidnapping Video : पावसापासून वाचण्यासाठी एक महिला दुकानाजवळ उभी होती. तेव्हा एका व्यक्तीने धावत येत तिचे अपहरण केले. दुकानाजवळ उभ्या असलेल्या महिलेला जबरदस्तीने रस्त्यावरील ट्रकमध्ये ओढण्यात आले. ही घटना दुकानाजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील चरम्पा चौकाखाली राष्ट्रीय महामार्ग १६ जवळ गुरुवारी (२ ऑक्टोबर) रात्री उशिरा घडली. एका ट्रक चालकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या महिलेचे अपहरण केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन ट्रक चालकाचा शोध सुरु केला आहे.

मुसळधार पाऊस असल्याने पीडित महिला ही रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानाच्या छताखाली थांबली होती. त्यावेळेस रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. याचा फायदा घेत ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या मध्येच थांबवला. महिलेजवळ जाऊन तिला जबरदस्तीने ट्रकमध्ये ओढले आणि घटनास्थळावरुन तो पळून गेला, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते.

महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला. पण रस्त्यावर कोणी नसल्याने तिला मदत मिळाली नाही. संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे. यात ट्रक थांबताना, चालक ट्रकमधून बाहेर पडताना आणि महिलेचे अपहरण करताना दिसून येते. या घटनेनंतर भद्रक शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडितेला वाचवण्यासाठी आणि अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arnav Khaire : अर्णव खैरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; लोकलमध्ये मारहाण करणाऱ्या प्रवाशांवर गुन्हा दाखल

Mahayuti Tension: सन्मानजनक द्या नाहीतर तुमचा खेळ खल्लास; शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला अल्टिमेटम

Sunday Horoscope : धनलाभ होणार, हातात पैसा खेळता राहणार; 5 राशींच्या लोकांना बंपर लॉटरी लागणार

Maharashtra Politics : मी स्टार प्रचारक, खर्चाची अजिबात चिंता करू नका; ऐन निवडणुकीत भाजप नेत्याचं वक्तव्य, चर्चांना उधाण

Terror Attack: पाकिस्तान आखतोय भारताविरुद्ध कट; ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी पुन्हा सक्रिय

SCROLL FOR NEXT