ED Raids Saam Tv
क्राईम

ED Raid: अलिशान घरात मॉडेल बोलवायचे, अश्लील व्हिडिओ तयार करायचे, ईडीने दाम्पत्याचा केला भंडाफोड

Noida ED Raid : ईडीने अलिशान घरात सुरू असलेल्या पॉर्न स्टूडिओचा भंडाफोड केला आहे. याप्रकरणी एका दाम्पत्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. व्हिडिओच्या माध्यमातून लाखो रूपयांची कमाई केल्याचे समोर आलेय.

Namdeo Kumbhar

Noida Couple Busted for Running Porn Studio in Luxurious Home : ईडीने नोएडामधील एका दाम्पत्याच्या पॉर्न स्टूडिओवर मोठा छापा मारला आहे. हे दाम्पत्य त्यांच्या अलिशान घरात मॉडेल्स बोलवून अश्लील व्हिडिओ तयार करत होते. या व्हिडिओंच्या माध्यमातून त्यांनी २२ कोटी रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे. या दाम्पत्याने आंतरराष्ट्रीय अश्लील संकेतस्थळांसाठी वेबकॅमवरून व्हिडिओ शूट केले आणि नंतर ते सायप्रसस्थित अशा वेबसाइट्सना विकले जात होते.

ईडीने नोएडामध्ये अश्लील संकेतस्थळासाठी व्हिडीओ तयार करणाऱ्या दाम्पत्याच्या घरी छापा मारला. हे दाम्पत्य मॉडेलला बोलवून अश्लील संकेतस्थळासाठी व्हिडीओ करायचे. हे व्हिडिओ आंतरराष्ट्रीय अश्लील साईटला विकले जात होते. नोएडामध्ये ईडीने हा मोठा भंडाफोड केला. या दाम्पत्यावर वेबकॅमवरून मॉडेलचे अश्लील व्हिडिओ शूट केल्याचा आरोप आहे.

आरोपी दाम्पत्य अश्लील संकेतस्थळासाठी व्हिडीओ तयार करत होते. त्यानंतर सायप्रसच्या एका कंपनीला हे व्हिडिओ विकले जात होते. सायप्रस ही आंतराराष्ट्रीय अश्लील साईटला होस्टिंग सेवा देतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने फेमा (विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियम) अंतर्गत दाम्पत्यावर कारवाई केली. ईडीने छापेमारीवेळी मिळालेल्या मॉडेलचा जबाब नोंदवलाय.

सबडिजी वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात ईडीकडून तपास केला जातोय. नोएडामधील दाम्पत्य या कंपनीचे मालक आहेत. ते घरामध्ये सायप्रसस्थित टेक्नियस लिमिटेड या कंपनीसाठी अश्लील व्हिडिओ तयार करत होते, अशी माहिती समोर आली आहे. टेक्नियस लिमिटेड ही कंपनी अश्लील संकेतस्थळाला चालवते.

विदेशातून पैसे मिळात होते...

ईडीमधील खात्रीलायक सूत्रांनी सांगितले की, या दाम्पत्याला विदेशातून पैसे मिळत होते. तसे पुरावे हाती लागले आहेत.या दाम्पत्यांनी खोटी माहिती देऊन खाती उघडली होती. जाहिराती, रिसर्च आणि जनमत सर्वेक्षण यांसारख्या कामांसाठी पैसे मिळतात, असे दाम्पत्याने बँकला सांगितले होते. हे दाम्पत्य एकूण कमाईतील ७५ टक्के रक्कम स्वत: घेत होते. तर २५ टक्के रक्कम मॉडेलला दिली जात होती. दाम्पत्याच्या बँक खात्यामध्ये १६ कोटी रूपये असल्याचे निदर्शनास आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT