ncp leader khwaja qureshi tadipar from 4 district ulhasnagar saam tv
क्राईम

NCP पदाधिकारी ख्वाजा कुरेशी चार जिल्ह्यातून तडीपार

उल्हासनगर शहरातील वाढती गुन्हेगारी राेखण्यासाठी पाेलिस दल सज्ज झाले आहे.

अजय दुधाणे

Ulhasnagar News :

राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेला ख्वाजा कुरेशी (ncp leader khwaja qureshi) यास विविध गुन्ह्यांप्रकरणी एक वर्षासाठी चार जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. मध्यवर्ती पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कुरेशी यास मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड या जिल्हातून तडीपार करण्यात आले आहे. (Maharashtra News)

ख्वाजा कुरेशी हा उल्हासनगर राष्ट्रावादी काँग्रेसचा शहर सचिव आहे. त्याच्या विरोधात अनेक पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीत वाढ होत असल्याने अखेर पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांचा आदेशाने मध्यवर्ती पोलिसांनी एक वर्षासाठी त्याला 4 जिल्हातून तडीपार केले आहे. याबाबतची माहिती विजय वाघमारे (वपोनि) यांनी दिली.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मध्यवर्ती पोलिसांनी ख्वाजा याला ताब्यात घेऊन तडीपार केले. त्यामुळे उल्हासनगर शहरातील गुन्हेगारी प्रवृतीचे गुंडानां अशाच प्रकारे कारवाई करतील असा विश्वास नागरिकांमध्ये बसला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विरूद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT