Navi Mumbai News Saam Digital
क्राईम

Navi Mumbai News : मैत्रिणीला हॉटेलमधून कामावरून काढलं; मित्र बनला तोतया पोलीस अधिकारी

Navi Mumbai Crime : पनवेलमधील एका हॉटेल मालकाला तोतया पोलीस अधिकारी बनून धमकवल्या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. मैत्रिणीला कामावरून काढल्याचा जाब विचारण्यासाठी तो तोतया पोलीस बनल्याची त्याने कबुली दिली आहे.

Sandeep Gawade

Navi Mumbai News

पनवेवमधील एका हॉटेमध्ये एक पोलीस अधिकारी अचानक आला आणि हॉटेल मालकाला शिव्या देऊ लागला. सुरुवातीला त्या मालकाला आणि स्टाफला नेमकं काय चाललंय समजलं नाही. त्यामुळे सर्वजण गोंधळून गेले. मात्र माझ्या मैत्रिणीला कामावरून का काढला असा जाब विचारू लागल्यानंतर प्रकार लक्षात आला. हॉटेल मॅनेजरला शिवीगाळही केली. त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर शिव्या देऊन जाब विचारणारा पोलीस अधिकारी तोतया असल्यांच समोर आलं. पोलिसांनी त्याला शिताफितीने अटक केलं असून सलमान मुलाणी असं त्याच नावं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल मधील एका हॉटेलमधून काही कारणास्तव एका तरुणीला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. हा प्रकार तिच्या मित्राला आवडला नाही. त्याने याचा जाब विचारयंच ठरवलं आणि हॉटेल मालकाला घाबरवण्यासाठी तो पोलीस अधिकारी बनला. हॉटेलमध्ये आल्यानंतर त्याने थेट मॅनेजरला थेट शिविगाळचं करायला सुरुवात केली. त्यामुळे हॉटेलमधील स्टाफ घाबरून गेला. त्यानंतर तो तेथून निघून गेल्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याची तक्रार पोलीस स्थानकात केली. मात्र असा नावाची व्यक्ती पोलीस खात्यातच नसल्यामुळे पोलीसही चक्रावून गेले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हॉटेमध्ये हुज्जत घालणारा तो पोलीस अधिकारी तोतया असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांनी त्याला अत्यंत शिताफितीने ताब्यात घेतलं. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्यांने आपल्या मैत्रिणीला कामावरून टाकल्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याची कबुली त्याने दिली आहे. दरम्यान या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakhi Sawant: 'बिग बॉस मराठी'च्या फिनालेसाठी राखी सावंतची लक्झरी तयारी; दुबईतून घेतला 'इतक्या' लाखांचा डिझायनर ड्रेस

Mumbai-Pune Missing Link: मुंबई पुणे मिसिंग लिंकचे उद्घाटन लांबणीवर जाणार; युद्धामुळे कामावर परिणाम

Maharashtra News Live Update: जगातील उष्ण शहरांच्या यादीमध्ये वर्ध्याचा समावेश

मोठी बातमी! कैसे हराया फेम सहर शेखचे नगरसेवक पद जाणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

High Income Job: शिक्षण कमी आहे म्हणून टेन्शन घेऊ नका! करा हे 5 कोर्स आणि मिळवा लाखोंचा पगार

SCROLL FOR NEXT