Navi Mumbai Crime Saam Digital
क्राईम

Navi Mumbai Crime: धक्कादायक! जन्मदात्या आईचा गळा आवळून खून

Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील कोपरी गाव येथे मुलाने जन्मदात्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Navi Mumbai Crime

नवी मुंबईतील कोपरी गाव येथे मुलाने जन्मदात्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रूपचांद रहेमान शेख याला एपीएमसी पोलिसांनी केली अटक केली असून सलमा रहेमान शेख असे मृत महिलेचे नाव आहे. एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामावर जाण्यावरून रुपचांद आणि त्याची आई सलमा यांच्यात मध्यरात्री भांडण झाले होते. या रागातून रुपचांदने घरातील गमजाने सलमा यांचा गळा आवळून त्यांचा खून केला. एपीएमसी पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि रुपचांदला ताब्यात घेतले. सलमा यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चारच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात मुलाने स्वतःच्या आईला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. एका आयटीआय पदवीधर तरुणाने आईने वेळेवर जेवण दिले नाही म्हणून तिला मारहाण केली. नंतर कोयत्याने वार केले. एवढ्यावरच न थांबता जखमी अवस्थेत घरातून बाहेत ओढून घेऊन गेला आणि तिच्यावर गवत टाकून पेटवून दिलं होतं. दरम्यान जन्मदात्या आईचीही हत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे कुठेतरी नात्यांमधील संवेदनशीलपणा हरवत चालल्याची प्रचिती येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ₹२००० साठी आताच करा हे काम, अन्यथा २२वा हप्ता विसरा

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

ZP Elections : मिनी विधानसभेचं बिगुल वाजणार, दोन की एकाच एकाच टप्प्यात निवडणूक? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT