Navi Mumbai crime Saam tv
क्राईम

Navi Mumbai crime : उरणमधील महिलेच्या हत्येचा उलगडा; पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

Navi Mumbai : नवी मुंबईच्या उरण तालुक्यातील चिरनेर येथील जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : उरण तालुक्यातील चिरनेर येथील जंगलात ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या महिलेचा मृतदेहाचा (Navi Mumbai) उलगडा झाला. प्रेमसंबंधातून सदर महिलेची हत्या झाल्याचे (Police) पोलीस तपासात समोर आले असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला २४ तासातच ताब्यात घेतले आहे.

नवी मुंबईच्या उरण तालुक्यातील चिरनेर येथील जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना सदर मृत महिला ही मानखुर्द येथील रहिवासी असून मानखुर्द पोलीस ठाण्यात महिलेची मिसिंग तक्रार करण्यात आली होती. पूनम क्षीरसागर (वय २७) असे महिलेचे नाव असून ती घरकाम करत होती. (Crime News) दरम्यान पूनमचे नागपाडा विभागातील निजामुद्दीन शेख या टॅक्सी ड्रायव्हरसोबत मागील ४ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र निजामुद्दीनचे आधीच लग्न झाले होते. यावरून त्यांच्यात वाद होत होते. 

फिरायला जाण्याचा बहाणा करत नेले 

पूनम लग्नाचा तगादा लावत असल्याच्या कारणावरून निजामुद्दीनने पूनमचा काटा काढायचे ठरवले होते. त्यानुसार १८ एप्रिलला फिरायला जायच्या बहाण्याने निजामुद्दीन पूनमला कल्याणमधील खडवली येथे घेऊन आला. याच ठिकाणी त्याच्या टॅक्सीमध्ये पूनमचा गळा आवळून खून केला. पूनमची हत्या केल्यानंतर निजामुद्दीनने उरणमधील चिरनेर येथील जंगल परिसरात रस्त्याच्या कडेला मृतदेह फेकून देत तेथून पळ काढला होता. उरण पोलीसांनी २४ तासातच आरोपी निजामुद्दीन शेखला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janmashtami and zodiac signs: जन्माष्टमीला शनीसह ग्रह होणार वक्री; 'या' ४ राशींकडे येणार पैसाच पैसा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वधर्मीय धार्मिक स्थळावरील सर्व भोंगे उतरवले

Accident News : कंटेनर चालकाचा अचानक यु टर्न; मोटारसायकल धडकली, एकाचा जागीच मृत्यू

Rajinikanth Movie Ticket: रजनीकांतचा जब्बरा फॅन! Coolie च्या तिकिटासाठी बारापट पैसा खर्च केला, किंमत वाचून धक्का बसेल

Maharashtra Politics: नवी मुंबईत भाजपला मोठं खिंडार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT