Pawannagar Three and four girls beat up girl  Saam Tv News
क्राईम

Nashik Crime : कबड्डीत अव्वल आल्याने डोक्यात तिडीक गेली, ३-४ पोरींनी एकटीला घेरुन बदडलं; नाशकातील 'तो' VIDEO व्हायरल

Nashik Female Students Fight over Kabaddi : तीन ते चार दिवसांपूर्वी पवननगर येथील विद्यालयात कबड्डी स्पर्धा ठेवण्यात आली होती. एक विद्यार्थिनीने स्पर्धा जिंकल्याने त्याचा राग मनात ठेवून काही विद्यार्थिनींनी त्याचा राग काढला.

Prashant Patil

नाशिक : कबड्डी स्पर्धेत एक नंबर आल्याने त्याचा राग मनात धरत विद्यार्थिनींची फ्री स्टाईल हाणामारी झाल्यचं समोर आलं आहे. काल दुपारच्या सुमारास नाशिकमधील पवननगर येथील एका विद्यालयातील विद्यार्थिनींनी मिळून एका विद्यार्थिनीला मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. या विद्यार्थिनींची फ्री स्टाईल हाणामारी बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तीन ते चार दिवसांपूर्वी पवननगर येथील विद्यालयात कबड्डी स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यामध्ये एक विद्यार्थिनीने स्पर्धा जिंकल्याने त्याचा राग मनात ठेवून दुसऱ्या गटातील विद्यार्थिनींनी पेपर सुटल्यावर त्याचा राग काढला. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. विद्यालयातील शिक्षकांना ही बाब समजताच त्यांनी पालकांना बोलून विद्यार्थिनींना समज दिली.

बापासमोरच बिबट्याचा २१ वर्षीय तरूणीवर हल्ला

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वनारवाडीतील २१ वर्षीय पायल चव्हाण या युवतीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. शेतात काम करताना बिबट्याने मुलीवर हल्ला केला होता. वडिलांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेने वानरवाडी गावावर शोककळा पसरली आहे. वनविभागाच्या निष्क्रियतेवर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नाशिक-दिंडोरी राज्य मार्गावरील वनारवाडी पाटाजवळ चव्हाण कुटुंबीय आपल्या शेतात गवत कापण्याच्या कामात व्यस्त होते. पायल ऊसाच्या शेतालगत गवत कापत होती. त्याचवेळी दबक्या पावलाने अचानक बिबट्याने मागून येऊन झडप घातली. बिबट्याने पायलला ६-७ फूट ओढत नेले. तिच्या किंचाळ्या ऐकून आजूबाजूचे शेतकरी आणि तिचे वडील धावले. गोंधळात बिबट्याने पायलला तिथेच सोडून पळ काढला. रक्तबंबाळ अवस्थेत पायलला नातेवाइकांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले. परंतु तिथे उपचारास नकार मिळाला. अखेर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT