नाशिक भोंदू बाबा प्रकरणात मोबाईलमधील डिलीट डेटा रिकव्हर; तपासात मोठा खुलासा होण्याची शक्यता. Saam tv
क्राईम

अशोक खरातचे डर्टी चॅट्स अन् नको ते व्हिडिओ आले समोर; पोलिसांनी रिकव्हर केला मोबाईल डेटा, मोठा भांडाफोड होणार

Ashok Kharat Case: नाशिक बनावट बाबा प्रकरणात, पोलिसांनी अशोक खरातचा डिलीट केलेला मोबाईल डेटा हस्तगत केला आहे. यामुळे मोठा खुलासा होण्याची अपेक्षा आहे.

Bharat Jadhav

  • अशोक खरात प्रकरणात मोबाईल डेटा रिकव्हरी मोठी घडामोड

  • चॅट्स, फोटो, व्हिडिओसह महत्त्वाचे पुरावे सापडले

  • एसआयटी आणि ईडी तपासात मोठा खुलासा शक्य

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटी आणि ईडीला मोठं यश आले आहे. पोलिसांना मोबाईलमधील डिलीट डेटा रिकव्हर करण्यात यश आले आहे. यामुळे मोबाईलमधून अशोक खरातचे डर्टी सिक्रेट्स समोर येण्याची शक्यता आहे. मोबाईलमधील चॅट्स, फोटो, व्हिडीओ, आणि नंबर रिकव्हर करण्यात आले आहेत. त्यामुळे एसआयटी आणि ईडीच्या हाती मोठे पुरावे लागण्याची शक्यता आहे.

खरातवर विवाहित महिलांसह युवतींना जाळ्यात अडकवल्याचा आरोप आहे. यासह आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणीही तपास सुरू आहे. त्यामुळे मोबाईलमधून अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक खरातविरोधात आरोप करणारे सुमारे पाच ते सहा फोन पोलीस हेल्पलाइनवर दररोज येत आहेत.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, २३ दिवसांत हेल्पलाइनवर शेकडो फोन आले आहेत. यातील बहुतांश तक्रारी महिलांकडून आल्या आहेत. अनेक प्रकरणांमध्ये फसवणूक, विश्वासघात आणि शोषणाचे गंभीर आरोप करणारे फोन कॉल्स होते. अशोक खरात यांच्यावर विविध कलमांखाली १५ गुन्हे दाखल झाले आहेत, त्यापैकी ८ गुन्हे महिलांशी लैंगिक संबंधित आहेत. हेल्पलाइनद्वारे मिळालेल्या तक्रारींच्या आधारे ४० जणांना साक्षीदार म्हणून त्यांची नोंद करण्यात आली आहे.

आता पोलिसांनी मोबाईलमधील डिलीट झालेल्या डेटा रिकव्हर केला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत कोणते नवीन खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

खरातच्या ट्रस्ट उपाध्यक्षाचा घात?

खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळकेंच्या अपघाती मृत्यूवरून घातपाताचा संशय बळावला आहे. ईडी चौकशी झालेल्या शेळकेंना पुरावे नष्ट करण्यासाठी संपवण्यात आलं का? आणि खरातच्या इतर ट्रस्टींवर कारवाई कधी होणार? असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. शेळकेंच्या मृत्यूवरून ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि अमोल मिटकरी यांनीही संशय व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT